Monday, July 1, 2024

प्रियंकाने भारत दौऱ्यामध्ये थेट गाठलं उत्तर प्रदेश, महिलांच्या सुरक्षेवर शेअर केली पोस्ट

देसी गर्ल प्रियंका चोपडा बऱ्याच दिवसांनी भारतामध्ये परतली होती, त्यामुळे तिचा यावेळचा भारत दौरा चांगलाच चर्चेत आला होता. अभिनेत्रीने सोशलस मीडियावर आपला आनंद गगनात मावेना अशाप्रकारे व्यक्त केला होता. भले ती भारतापासून लांब असली, तरी ती आपल्या मायदेशाला विसरली नाही. जरी भारतमध्ये परतली असली तरीही तिने आपल्या कामाला जास्त महत्व दिले. खरं तर ती हेअर केअर ॲनोमाली ब्रॅंडचं प्रमोशन करण्यासाठी आली होती. यानंतर तिने थेट उत्तर प्रदेशाला भेट दिली.

अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) ही आपल्या दमदार अभिनयासोबत सोशल वर्कर म्हणूनही ओळखली जाते. तिने बाहेर देशामध्ये अनेकवेळा लहान मुलांच्या सुविधासाठी मदत केली आहे, त्यांना हव्या त्या गोष्टी पुरवल्या आहेत. यावेळेस अभिनेत्री बऱ्याच दिवसांनी भारतामध्ये पोहोचली त्यामुळे तिने आपल्या कामामध्ये व्यस्त असूनही भारतामध्ये अनेक गोष्टींचा आढावा घेतला.

युनिसेफ इंडियाची ॲम्बेसिडर असल्यामुळे प्रियंका उत्तर प्रदेशामधील छोट्या गावांमध्ये फिरताना दिसली. तिथे तिने वेगवेळ्या संस्थांची भेट घेतली असून शिक्षण संस्था, मुलांचे शिक्षण, आणि त्यांच्या आरोग्य पोषणाची माहिती घेतली. केवळ विद्यार्थीच नाही तर महिलांवरील होणारे अत्याचार, लैंगिक शोषण आणि छळाविरोधातही सहकर्य करणाऱ्या कंट्रोल रुमचीही मुलाखत घेतली. प्रियंकाने माहिती घेत असताना एक व्हिडिओदेखिल बनवला ज्यामध्ये ती 1090 वुमन पॉवर लाईन मधील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारत म्हणते की, “मला उत्तर प्रदेशबद्दल काही सांगा. मी देखिल लखनऊमध्ये राहिले आहे. इथे एरप्रकारची भीती आहे, खास करुन संध्याकाळी सात वाजल्यानंतर.”

 

View this post on Instagram

 

यानंतर महिला पोलिस अधिकारी नीरा सावंत प्रियंकाला मध्येच थांबवते आणि म्हणते की, “मी तुम्हाला डेटा दाखवते’ असं म्हणत तिला कंट्रेल रुममध्ये घेऊन जाते आणि त्या ठिकाणचे काम कशाप्रकारे होते, नवीन तंत्रज्ञानाचा किती फायदा होतो या गोष्टींबद्दल माहिते सांगते. भारताची एवढी प्रगती पाहून प्रियंका कौतुक करते.

 

View this post on Instagram

 

प्रियंकाने व्हिडिओ शेअर करत असताना नोटमध्ये तिने कंट्रोल रुमला भेट देण्याचा आनंद व्यक्त केला असून भारतातील महिला आणि मुलांवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल लिहिले की, “राजकारणी आणि भ्रष्टाचाराच्या भीतीमुळे बऱ्याच महिला आणि मुले तक्रार करत नाहीत. मला आशा आहे की, हेल्पलाईनमुळे ते तक्रार करु शकतील. महिलांच्या सुरक्षेसाठी अजून बऱ्याच सुविधा करण्याची गरज आहे, परंतु अशे उपक्रम अमलात आनण्यासाठी ही चांगली सुरुवात आहे, आणि जर ही प्रभावशाली बनत असेल तर लवकरच भ्रष्टाचार आणि हिंसाचाराला आळा घालता येईल.”

अशाप्रकारे अभिनेत्रीने नोटमध्ये भावना व्यक्त करुन भारत दौरा पूर्ण केला आणि पुन्हा आपल्या सासरवाडी म्हणजेच अमेरिकेला परतली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऊंचाई’ चित्रपट पाहिल्यानंतर शहनाज गिलनं व्यक्त केल्या भावना; म्हणाली,’ या चित्रपटाद्वारे संदेश…’
सामना इंग्लंडVSभारताचा आणि चर्चा उठल्यात शाहिद कपूरची बहायको मीरा राजपूतच्या…

 

हे देखील वाचा