Sunday, May 19, 2024

सामना इंग्लंडVSभारताचा आणि चर्चा उठल्यात शाहिद कपूरची बहायको मीरा राजपूतच्या…

नुकताच पार पडलेला भारतीय क्रिकेट सामना ‘टी20’ विश्नचषकामध्ये भारत आणि इंग्लंडच्या सेमीफायनलमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद आणि 168 धावा केल्या होत्या. मात्र टॉसमध्ये इंग्लंड संघाने बाजी मारली आणि भारताची सुरुवातच खराब झाली होती. दोन्ही संघामध्ये कडाक्याची टक्कर झाली. मात्र, या सगळ्यामध्ये शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखणारा अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याची पत्नी मीरा राजूत ( Mira Rajput) हिने इंग्लंड आणि भारता T20 विश्वचषक सामना सुरु असल्यामुळे अनेकजनाचे लक्ष सान्याकडेच टिकूण होते मात्र, मीराने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन विराट कोहली (Virat Kohli) याचा फोटो शेअर करुन अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सामन्यापेक्षा जास्त मीराच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

मीराने आपल्या इंस्टग्राम स्टोरीवर विराटचा फोटो शेअर केला होता ज्यामध्ये विराट बॅटिंग करत असताना दिसून येत आहे. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कम ऑन इंडिया’ बगता बगता मीराची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि लोक तिने शेअर केलेल्या फोटोचे खूप कौतुक करत आहेत. मीराच्या या पोस्टवरुन समजत आहे की, तिने देखिल आज पुर्ण कुटुंबासोबत भारत आणि इग्लंड T20 सामन्याचा आनंद लुटला आहे.

meera rajput
photo courtesy: instagram/mira.kapoor
Verified

मीराने फोटोसोबत एक व्हिडिओदेखिल शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “रियल कबीर सिंग. क्या आप प्लीज जरा शांत बैठेंगे इसकेलिए इंतजार करिए.” या व्हिडिओला कबीरसिंगमध्ये प्रितिची भूमिका निभवणारी कियारा अडवाणी (Kiara Advan) हिने देखिल लाइक केले आहे. त्यासोबतच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी देखिल या पोस्टला लाइक केले आहे.

 

View this post on Instagram

 

मीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती ‘कबीर सिंग’ चित्रपटातील ‘तुम्हे कितना चाहने लगे हम’ या गाण्याची धून वाजवताना दिसते आणि शाहिद पायऱ्यावरुन उतरत असताना प्रिती करुन ओरडतो आणि तिला जोरात मिठी मारतो. तिचा हा व्हिडिओदेखिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘द काश्मीर फाइल्स’ नंतर विवेक अग्निहोत्रीने केली नव्या चित्रपटाची घोषणा; तब्बल 11 भाषांमध्ये होणार रिलीझ
रुपाली भोसलेचं मनमोहक रूप, चाहते घायाळ!

 

हे देखील वाचा