बॉलिवूडची पीसी गर्ल अध्या हॉलिवूड देखील मोठ्या प्रमाणावर गाजवत आहे. प्रियांका चोप्रा जोनस ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मागील बऱ्याच काळापासून प्रियांका तिच्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. त्यातही ती तिच्या नवऱ्यासोबत देखील वेळ घालवताना दिसत आहे. सध्या प्रियांका पती निक जोनससोबत असल्याचे दिसत आहे.
प्रियंकाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने बिकिनी घातली आहे. लाल आणि काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये प्रियांका सनबाथ घेत आहे. प्रियंकाने तिचा हा रिलॅक्स सेल्फी पोस्ट करताना लिहिले, “अशा प्रकारचा रविवार.’ हा फोटो तिने झोपल्या झोपल्या काढला असून, यात ती अतिशय मादक दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिचा अँटी असणाऱ्या निक जोनासने कमेंट करत लिहिले, “यम्मी’. यासोबतच प्रियांकाची बहीण असणाऱ्या परिणीती चोप्राने लिहिले, “जिजाजी आणि ताई तुम्ही हे काय करत आहेत? इंस्टाग्रामवर कुटुंबातील लोकं देखील असून, मी माझे डोळे बंद करून लाईकचे बटन दाबत आहे. (priyanka chopra shares sunday special bikini photo)
प्रियांकाचे हे फोटो पाहून सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे. एक जणं म्हणाला, ‘शी यार हे काय झाले आहे तुम्हाला.’ तर दुसरा म्हणाला, ‘हे सगळे करण्यासाठी तुला अमेरिकेला पाठवले आहे.’ तिसरा म्हणाला, ‘यालाच म्हणतात अश्लीलता, आम्ही तुझ्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करत नाही.’ एक युजर म्हणाला, ‘हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यासारखा असल्याचे तुला वाटते?’ तर एक नेटकरी म्हणाला, ‘ही काय भारताची संस्कृती आहे?’
प्रियांकाचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत असून, लाखो लाइक्स येत आहेत. प्रियांका आणि निक त्यांच्या कामाच्या निमित्ताने सतत वेगवेगळ्या शहरात राहतात. त्यामुळे कित्येक महिन्यांनी त्यांची भेट होते. शिवाय प्रियंकाने नुकतेच तिचे ‘सोना’ हे हॉटेल देखील सुरु केले आहे.
प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात दिसणार असून, या सिनेमात सेलिन डायोन आणि सॅम ह्यूघन यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय ती ‘मॅट्रिक्स ४’ आणि अभिनेता फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य