संजय लीला भन्साळी आपल्या भव्य चित्रपट निर्मितीसाठी ओळखले जातात. भव्यदिव्य सेट, जड पोशाख आणि भारदस्त स्टारकास्ट एकंदरित यामुळे त्यांचा चित्रपट हिट झाल्या शिवाय राहत नाही. यातीलच त्यांचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट बॉलिवूडमधील भव्य आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हा संजय लीला भन्साळींच्या टॉप चित्रपटांपैकी एक आहे.
बॉलिवूडमधील मोठमोठे कलाकारही संजय लीला भन्साळींच्या चित्रपटांमध्ये काम करू इच्छितात. पण, अभिनेत्री प्रियांका चोप्राला ‘बाजीराव मस्तानी’ची शूटिंग सुरू झाल्यानंतर, चित्रपट मध्येच सोडायचा होता. होय हे खरं आहे. याचा खुलासा स्वतः रणवीर सिंगने एका मुलाखतीदरम्यान केला होता. या चित्रपटामध्ये रणवीरने मुख्य भूमिका साकारली होती. त्याने यात बाजीरावची भूमिका केली होती. (priyanka chopra wanted to leave bajirao mastani in mid of shooting)
त्याचवेळी चित्रपटात दीपिका पदुकोणने मस्तानीची भूमिका आणि प्रियांका चोप्राने बाजीरावची पत्नी काशीबाईची भूमिका साकारली. पण आश्चर्य म्हणजे, प्रियांका चोप्राला शूटिंगच्या तिसऱ्या दिवशी चित्रपट सोडायचा होता. रणवीर सिंग एका मुलाखतीत म्हणाला होता, “चित्रपट सुरू झाल्याच्या तिसऱ्या दिवशीच प्रियांका चोप्राच्या धाडसाने उत्तर दिले आणि तिने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.”
रणवीरच्या म्हणण्यानुसार, प्रियांका चोप्रा कदाचित संजय लीला भन्साळींच्या वेगळ्या कार्यपद्धतीसाठी तयार नव्हती. रणवीर सिंगने प्रियांका चोप्राचे असे वर्तन पहिल्यांदाच पाहिले होते आणि त्याच्यासाठी हे खूप विचित्र होते. रणवीरच्या म्हणण्यानुसार, प्रियांका विचार करत होती की, काय चाललं आहे, खरोखरच असा प्रकार घडत आहे का? तीन दिवसातच ती म्हणाली होती की, तिला चित्रपट सोडायचा आहे आणि ती घरी जात आहे.
प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर या चित्रपटात ती सहाय्यक भूमिकेत होती आणि तिला यासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या पात्रासाठी तिचे खूप कौतुक झाले. प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत नव्हती, पण तिच्या पात्राने चित्रपटात जीव आणला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. चित्रपट रिलीझच्या वेळीही समीक्षकांनी म्हटले होते की, प्रियांका चोप्रापेक्षा दुसरे कोणी हे पात्र इतक्या उत्तमरीत्या साकारू शकत नव्हते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तणावापासून दूर राहण्यासाठी प्रियांका पोहचली माशांच्या जगात, स्पेनमध्ये करतेय स्कूबा डायविंग
-निक जोनास पत्नी प्रियांका चोप्रावर किती प्रेम करतो? लाईव्ह कॉन्सर्टमध्ये व्यक्त केल्या आपल्या भावना
-‘द बिग पिक्चर’ शोदरम्यान रणवीर सिंग झाला भावूक, ‘या’मुळे अभिनेत्याला अनावर झाले अश्रू