बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (priyanka chopra) सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी तिचे लाखो चाहते तिच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. तो सध्या हॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. अशातच ती येत्या काळात बॉलिवूडमधील काही सिनेमात दिसणार असल्याची माहिती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार प्रियांका येत्या काळात हृतिक रोशनसोबत क्रिश ४ या सिनेमात दिसणार आहे. हि बातमी आल्यापासून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“क्रिश ४” मध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दल चाहत्यांना बऱ्याच काळापासून उत्सुकता होती. आता, बॉलिवूडमध्ये अशी माहित पसरत आहे की प्रियांका चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. प्रियांका चोप्रा बऱ्याच काळापासून “क्रिश” चित्रपटाशी जोडलेली आहे. तिने दोन चित्रपटांमध्ये हृतिक रोशनसोबत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटांमध्ये हृतिकसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. त्यामुळे ती या चित्रपटात परतण्याची शक्यता आहे.
“क्रिश ४” मध्ये हृतिक रोशन केवळ भूमिका करणार नाही, तर तो त्याचे दिग्दर्शनही करेल. हा त्याचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट असेल. हृतिक कॅमेऱ्यामागील गोष्टी कशा हाताळेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
प्रियांका चोप्रा शेवटची “द स्काय इज पिंक” चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांच्यासोबत काम केले होते. त्यानंतर तिने परदेशी चित्रपटांमध्ये काम केले. ती लवकरच “वाराणसी” चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत परतणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
माझ्या पोस्टमुळे गैरसमज झाला होता…, विक्रांत मेस्सीने निवृत्तीच्या पोस्टवर सोडले मौन


