होळी हा भारतातील असा सण आहे, जेव्हा भारतीय सगळ्या गोष्टी विसरून होळीच्या रंगामध्ये रंगत असतात. हा रंगांचा उत्सव सर्वत्र खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. अनेक कलाकार देखील हा सण आनंदाने साजरा करताना दिसतात, तर काहीजण थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. असाच एक थ्रोबॅक व्हिडिओ बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा व्हायरल झाला आहे.
प्रियांकाचा 2020मधील एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका तिचा पती निक जोनास सोबत होळी खेळताना दिसत आहे. मागच्या वर्षी होळीच्या आधी ते दोघे इशा अंबानीच्या घरी होळी पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर त्या दोघांनी एकत्र होळी साजरी केली. प्रियांका आणि निकचा हा व्हिडिओ पुण्यामधील आहे. या व्हिडिओमध्ये काही मुले निक आणि प्रियांकाच्या अंगावर पाणी टाकताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लहान मुले प्रियांकाच्या अंगावर पाण्याची बादली टाकतात. हे सगळं बघून निक अगदी चूपचाप उभा राहतो. परंतु नंतर ही सगळी मुलं निकच्याही अंगावर पाणी टाकतात. अशाप्रकारे होळी साजरी करताना प्रियांका खूपच खुश दिसत आहे. त्या दोघांचा हा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
प्रियंका चोप्रा होळीचा सण साजरा करण्यासाठी निक सोबत भारतात आली होती. तिचे अंबानींच्या घरातील पार्टीमधील अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिच्या ‘द मॅट्रिक्स फोर’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे. यामुळे ती खूपच चर्चेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आहा! होळीच्या दिवशी पत्नी गौरीसोबत डान्स करतानाचा शाहरुख खानचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच