Sunday, April 14, 2024

TMKOC | तब्बल ५ वर्षांनंतर शोमध्ये दिसणार ‘दयाबेन’, निर्माते असित मोदींनी केलं ‘कन्फर्म’

टेलिव्हिवरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘च्या (TMKOC) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अलीकडेच, शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, ते दयाबेनला परत आणण्याचा विचार करत आहेत. दिशा वकानीबद्दल (Disha Vakani) सांगायचे झाले, तर ती गेल्या ५ वर्षांपासून शोमधून गायब आहे.

‘दयाबेनचे पात्र परत आणणार’
असित म्हणाले, “आमच्याकडे दयाबेनची व्यक्तिरेखा परत न आणण्याचे कोणतेही कारण नाही. पण अलीकडच्या काळात आपण सर्वांनी कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. २०२०-२१ हा आपल्या सर्वांसाठी खूप कठीण टप्पा होता. पण आता परिस्थिती चांगली झाली आहे. २०२२ मध्ये आम्ही दयाबेनची व्यक्तिरेखा परत आणणार आहोत आणि प्रेक्षकांना जेठालाल आणि दया भाभी यांचा विनोदी अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळेल.” (producer asit modi confirms dayaben is returning to tmkoc after 5 years)

‘दिशा शोमध्ये परतणार की नाही हे माहिती नाही’
असित पुढे म्हणाले, “दिशा वकानी दया बेनच्या भूमिकेत परत येईल की नाही, हे मला अद्याप माहित नाही. दिशा जीसोबत आमचे अजूनही चांगले नाते आहे आणि आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. पण आता ती विवाहित आहे आणि तिचे एक मूलही आहे. काही काळानंतर प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतो.”

‘दयाबेन शोमध्ये नक्कीच दिसणार’
असित म्हणतात, “आपल्या सर्वांचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य आहे, त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. पण दिशा बेन असो किंवा निशा बेन, तुम्हाला दयाबेन नक्कीच पाहायला मिळेल. आम्ही एक टीम म्हणून तीच मजा देण्याचा प्रयत्न करू, जी आम्ही तुम्हाला याआधी दिली आहे.”

दिशा शेवटची सप्टेंबर २०१७ मध्ये शोमध्ये दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, असे बोलले जात होते की दिशाच्या पतीने निर्मात्यांकडे मागणी केली होती की, अभिनेत्री एका दिवसात फक्त ४ तास आणि महिन्यात फक्त १५ दिवस काम करेल. अशी मागणी निर्मात्यांनी धुडकावून लावली, त्यामुळे दिशाची निर्मात्यांवर नाराजगी वाढत गेली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा