‘फुकरे ३’ या चित्रपटाचा प्रेक्षक खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. पुलकित सम्राटने सोशल मीडियावर सगळ्यांना सांगितले आहे की, या चित्रपटाची शूटिंग चालू झाली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अली फजल, वरुण शर्मा, ऋचा चड्डा, मनजोत सिंग, पंकज त्रिपाठी यांसारखे कलाकार दिसणार आहेत. पुलकितने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलं आहे. या फोटोत त्याच्यासोबत वरुण शर्मा देखील दिसत आहे.
या चित्रपटात वरुण शर्मा हनी चूचा या खास भूमिकेत दिसणार आहे. त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून लिहिले आहे की, “भाई भाई.” या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. अनेक चाहते तसेच कलाकार देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर पुलकितची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री कृती खरबंदाने फोटोवर एक कमेंट केली आहे..तिने लिहिले आहे की, “मेरे दो अनमोल रतन.” हा फोटो पाहून असे वाटत आहे की, त्याने चित्रपटाच्या शूटिंगवरील हा फोटो शेअर केला आहे.
अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून त्यांची उत्सुकता दाखवत आहेत. एकाने लिहिले आहे की, “इस्ट और वेस्ट चुचा इज द बेस्ट.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “सर तुमची कॉमेडी खरचं एकदम मस्त आहे. तुमची बोलण्याची जी पद्धत आहे ती देखील एकदम मस्त आहे.” आणखी एकाने लिहिले आहे की, “हा चित्रपट एकदम हिट होणार आहे.”
पुलकित सम्राटने रविवारी त्याच्या चाहत्यांना ‘फुकरे ३’ या चित्रपटाची शूटिंग सुरू होत असल्याची माहिती दिली. त्याने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. ज्यात तो क्लपर बोर्ड पकडलेला दिसत होता. दुसऱ्या फोटोत वरुण शर्मा आणि मनजोत सिंग दिसत होते
वरुण शर्माने मनजोत सिंगसोबत फोटो शेअर करून लिहिले होते की, “फुकरे ३ तुमच्या सेवेत.” या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. यावर डिझायनर मनीष मल्होत्रा, क्रिकेटर सुरेश रैना, सोफी चौधरी तसेच बाकी अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. याआधी वरुण शर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर विमानात बसून फुकरेचे को स्टार मनजोज सिंगने सेल्फी शेअर केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :