×

मुंबई पोलिंसावरही चढला ‘श्रीवल्ली’ गाण्याचा मोह, व्हिडिओमध्ये पाहा शानदार परफॉर्मेंस

आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर ‘पुष्पा’मधील गाण्यांवर नाचताना किंवा परफॉर्म करताना दिसत आहे. चित्रपटातील गाण्यांपासून ते डायलॉग्सपर्यंत सर्वकाही सुपरहिट ठरले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसला आपल्या यशाने हादरवले. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, अनेकांनी चित्रपटाच्या डायलॉग्सवर किंवा गाण्यांच्या हुक स्टेप्सवर व्हिडिओ बनवले आहेत. आता मुंबई पोलिसांनीही हा ट्रेंड फॉलो करत ‘श्रीवल्ली’ गाण्यावर परफॉर्मन्स दिला आहे.

‘खाकी स्टुडिओ थांबणार नाही’
हा व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच आपल्या ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत मुंबई पोलिसांनी लिहिले की, “खाकी स्टुडिओ थांबणार नाही. आम्ही मुंबईकरांना श्रीवल्लीच्या तालावर नाचताना पाहिले. आम्हीही त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला.” (mumbai police band khaki studio great performance on pushpa song srivalli)

युजर्स करतायेत कौतुक
हा व्हिडिओ नुकताच शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत याला ३० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका युजरने ट्विटरवर लिहिले, “अप्रतिम वाजवलं. कामानंतर दमवलेल्या संघाला प्रेरित करण्यासाठी आहे.” एकाने म्हटले, “त्यांनी संगीताचा आनंद घ्यावा.” एकाने लिहिले, “अद्भुत, इतके सुंदर वाजले हे ऐकून आनंद झाला.” तर एक म्हणाला, “उत्तम पोलीस दल.”

३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील
‘पुष्पा’बद्दल बोलायचे झाले, तर अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपटाचा पहिला भाग होता. चाहते आता त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post