कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी (३१ मे) एका नाट्यप्रयोगादरम्यान अनपेक्षित प्रसंग घडला. रंगमंचावर नाटक सुरू असतानाच, प्रेक्षागृहात ‘मूषक नाटक’ सुरू झाले – कारण एका उंदराने थेट प्रेक्षकांमध्ये हजेरी लावली. या प्रकारामुळे एक महिला प्रेक्षक घाबरून नाटक अर्धवट सोडून प्रेक्षागृहातून बाहेर पडली. यामुळे अन्य प्रेक्षकांचाही मूड खराब झाला.
उंदरांचे प्रेक्षागृहात दिसणे हे काही नवे नाही, मात्र या घटनेनंतर पुणे महापालिकेने अखेर जाग घेतली असून संबंधित नाट्यगृहाची तात्काळ स्वच्छता सुरू करण्यात आली आहे.
पुण्यातील एकूण १४ नाट्यगृहांपैकी बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि लोकशाहीर अण्णाभाऊ नाट्यगृह या ठिकाणी सर्वाधिक नाटके सादर केली जातात. मात्र या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव, डासांचा त्रास, अस्वच्छ शौचालये आणि आता उंदरांची समस्या यामुळे प्रेक्षक त्रस्त झाले आहेत. यशवंतराव नाट्यगृहातील घटना ऐरणीवर आली असली तरी बालगंधर्वसह इतर नाट्यगृहांतही स्थिती फार वेगळी नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
तंदुरुस्त राहण्यासाठी करीना कपूर संध्याकाळी ६ वाजता करते जेवण; जाणून घ्या तिची दिनचर्या