Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड Urfi Javed : ‘या’ सेलिब्रिटीने थेट घातली उर्फी जावेदला लग्नाची मागणी; अभिनेत्री म्हणाली, ‘लग्न करणार…’

Urfi Javed : ‘या’ सेलिब्रिटीने थेट घातली उर्फी जावेदला लग्नाची मागणी; अभिनेत्री म्हणाली, ‘लग्न करणार…’

सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद होय. उर्फी जावेद सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ (Urfi Javed Video) सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. उर्फी जावेद सोशल मीडियावर सतत ट्रोल होताना दिसते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याचा संबंध र्फी जावेदशी लावला जात आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Marriage) आणि ‘बिग बॉस’ फेम पुनीत सुपरस्टार (Puneet Superstar) यांची लग्नाचा विषय सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. पुनीतने उर्फीला हात जोडून लग्नाची मागणी केली आहे. उर्फीने मात्र त्याला नकार दिला आहे. पुनीत सुपरस्टारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीमध्ये (Video) तो उर्फीला म्हणत आहे की,”उर्फी जावेद यार, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनातली एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. पण कसं सांगावं हे कळत नाही. उर्फी मला तुझ्यासारखी मुलगी जोडीदार म्हणून हवी आहे. मी हात जोडून तुला विनंती करतो कृपया माझ्यासोबत लग्न कर”.

 

View this post on Instagram

 

A post shared by prakash kumar (@puneetsuper_starrrr)

उर्फी जावेदने मात्र पुनीतला नकार दिला आहे. पापराझींसोबत बोलताना उर्फी म्हणाली की,”पुनीतसोबत लग्न करणार नाही. पण लव्ह यू टू”. उर्फी जावेद आणि पुनीत सुपरस्टार दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. उर्फी तिच्या अतरंगी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. आता त्यांची लग्नाची मागणीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

पुनीत हा लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुयंसर आणि युट्यूबर आहे. नेटकरी या दोघांच्या लग्नाच्या मागणीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकरी म्हणत आहेत की, ही फक्त एक स्टंट आहे. तर काही नेटकरी म्हणत आहेत की, ही दोघेही एकत्र छान दिसतील. (Puneet superstar asked actress Urfi Javed for marriage)

आधिक वाचा-
‘मलायकाशी लग्न कधी करणार?’ करण जोहरच्या शोमध्ये अर्जुन कपूरने दिले खुलेपणाने उत्तर
Breaking! प्रसिद्ध गायकाचे स्टेजवर गात असताना भर कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हे देखील वाचा