Saturday, August 2, 2025
Home साऊथ सिनेमा कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचा मुलगा होता पुनीत; वीरप्पनने केले होते त्याच्या वडिलांचे अपहरण

कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचा मुलगा होता पुनीत; वीरप्पनने केले होते त्याच्या वडिलांचे अपहरण

दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमार गुरुवारी (१७ मार्च) रोजी त्याची पहिली जयंती आहे. मागच्या वर्षी त्याने सगळ्यांना दुःखद धक्का देऊन या जागचा निरोप घेतला. त्याच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत दुःखाचे सावट पसरले होते. आज त्याच्या वाढदिवशी सगळेच त्याचे चाहते त्याची आठवण काढत आहेत. त्याच्या मृत्यूनंतर कन्नड मध्ये सगळी चित्रपट गृहे बंद होती. तसेच सर्वत्र कलम १४४ लागू केले होते. चला तर आयुष्यावर एक नजर टाकूया.

बालकलाकार म्हणून केली होती कारकिर्दीची सुरुवात
पुनीतने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. यावरून त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज लावता येतो.

अभिनेत्यासह होता गायक
पुनीत केवळ अभिनेताच नाही, तर गायकही होता. त्याचा जन्म १७ मार्च, १९७५ रोजी झाला होता. २००२ मध्ये आलेल्या ‘अप्पू’ या चित्रपटातून त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने २९ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.

वडिलांचे झाले होते अपहरण
पुनीतचे दक्षिण भारतीय चित्रपटांमधील प्रसिद्ध नाव होते. पुनीतचे वडील राजकुमार हे इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. त्यांना कन्नड चित्रपटसृष्टीचे आयकॉन मानले जायचे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले कन्नड इंडस्ट्री अभिनेते होते. त्यांचे २००० मध्ये चंदन तस्कर वीरप्पन याने अपहरण केले होते.

पुनीत होता घरातील सर्वात लहान मुलगा
पुनीत हा पाच भावंडांमध्ये सर्वात लहान होता. पुनीतचे वडील राजकुमार  त्याच्या बहिणीला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जायचे. पुनीतचा मोठा भाऊ शिवा राजकुमार हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. चित्रपटांसोबतच त्याने छोट्या पडद्यावर कन्नड कोटियाधिपती हा गेम शो देखील होस्ट केला. पुनीत हा कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

 

हे देखील वाचा