मागील वर्षी कन्नड चित्रपटक्षेत्रातील दिग्गज अभिनेता पुनीत राजकुमारच्या मृत्युने संपूर्ण देशाला जोरदार धक्का बसला होता. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या मृत्युने त्याच्या चाहत्यांवर दुःखाचा जणु डोंगरच कोसळला होता. मात्र पुनितच्या चाहत्यांना त्याला पडद्यावर पाहण्याची संधी लवकरच मिळणार असून त्याचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘जेम्स’चा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तो एका सैनिकाची भूमिका साकारणार असून त्याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर हा पोस्टर पाहून पुनीतचे चाहते भावूक झाले आहेत.
कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक पुनीत राजकुमारच्या (punith rajkumar) मृत्युने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली होती. पुनीत राजकुमार हा आपल्या अभिनयासह सामाजिक कार्यासाठीही विशेष प्रसिद्ध होता. त्याच्या अकाली मृत्युची बातमी सगळ्यांनाच चटका लावून गेली होती. आता पुनीत राजकुमार यांच्या पत्नीने अश्विनी पुनीत राजकुमार यांनी त्यांच्या ‘जेम्स’ चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात पुनीत एका सैनिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
हा पोस्टर पाहून पुनीतच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या आकर्षक पोस्टरवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. यावर एका चाहत्याने ”आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमची खूप आठवण येतेय,” असा भावुक संदेश लिहिला आहे. तर दुसऱ्या एका युजरने ”पोस्टर किती प्रेमाने तयार केलाय,” अशी सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. आता चाहते पुनीतच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत.
तत्पुर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन कुमार यांनी पुनीतचा फस्ट लूक प्रजासत्ताक
दिनी प्रदर्शित करण्यात येणार होता. सोबतच त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल बोलताना हा चित्रपट पुनीतच्या जन्मदिनी म्हणजे १७ मार्चला प्रदर्शित केला जाणार आहे अशी माहीती दिली आहे. याबद्दल त्यांनी पुनीतसोबत चर्चा केली होती असा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे. त्या दिवशी गुरुवार असुन हा पुनीतचा शुभवार होता असाही खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. जेम्सबरोबर ‘मॅन ऑफ द मॅच’, ‘वन कट टु कट’ आणि ‘फॅमिली पॅक’ हे चित्रपटही यावेळी प्रदर्शित होणार आहेत.
हेही वाचा :
- प्रसिद्ध कथकली नृत्यांगना मिलेना साल्विनी यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केला शोक व्यक्त
- बिग बॉसनंतर पहिल्यांदाच पती रितेशसोबत स्पॉट झाली राखी सावंत म्हणाली, ‘कशी आहे आमची जोडी?’
- ‘या’ अभिनेत्रीसोबतब्रेकअप झाल्यावर विक्रम भट्ट यांनी मारली होती इमारतीवरून उडी, पुढे झाले असे…