Saturday, July 6, 2024

पुनीतच्या निधनातून अजूनही सावरू शकले नाहीत चाहते, स्मृतीस्थळी पाहायला मिळतायत लांबत लांब रांगा…

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार याच्या निधनामुळे संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. २९ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. ४६ वर्षीय अभिनेत्याचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याने, सर्वांनाच धक्का बसला. दिवंगत अभिनेत्याच्या मृत्यूला आज १२ दिवसाहून अधिक काळ लोटला आहे. तरी देखील पुनीतचे चाहते त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरू शकले नाहीत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पुनीतच्या चाहत्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. खरं तर हे चाहते पुनीतच्या स्मृतीस्थळी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहेत. स्मृतीस्थळी पोहचून चाहते अभिनेत्याला आदरांजली वाहताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एक अभिनेता असण्यासोबतच, बहु-प्रतिभावान पुनीत राजकुमार पार्श्वगायक, टीव्ही प्रस्तुतकर्ता, निर्माता देखील होता. पुनीत राजकुमार हा कन्नड चित्रपटातील त्याच्या योगदानासाठी ओळखला जात होता. २९ चित्रपटांमध्ये त्याने मुख्य कलाकार म्हणून काम केले. बालकलाकार म्हणूनही त्याने अनेक चित्रपट केले. ‘वसंता गीता’, ‘भाग्यवंता’, ‘चालिसुवा मोडगालू’, ‘एराडू नक्षत्रगालू’, ‘बेट्टाडा हूवू’ या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले.

पुनीतचे वडील राजकुमार हे इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. ते कन्नड चित्रपटसृष्टीचे आयकॉन मानले जायचे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले कन्नड इंडस्ट्री अभिनेता होते. पुनीतचे वडील राजकुमार त्याला आणि त्याच्या बहिणीला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जायचे. शिवाय कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी पुनीत एक होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुर्याचा दमदार ड्रामा चित्रपट आहे ‘जय भीम’, पाहण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

हे देखील वाचा