कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांना दिली गेली मरणोपरांत डॉक्टरेटची उपाधी, पत्नीने स्वीकरली पदवी

पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) हे कन्नड सिनेमातील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. मात्र दुर्दैवाने त्यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. पुनीत हे कर्नाटकमध्येच नाही तर संपूर्ण साऊथमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हृदयविकाराच्या धक्क्याने पुनीत यांचे मागच्या वर्षी निधन झाले. एका माहितीनुसार जिममध्ये मोठे वजन उचलल्यामुळे त्यांना ह्रदयविकाराचा धक्का आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांना मरणोपरांत म्हैसूर विश्वविद्यालयाकडून (यूओएम) डॉक्टरेट ही अतिशय मनाची समजली जाणारी पदवी प्रदान करण्यात आली.

पुनीत राजकुमार यांना त्यांच्या मनोरंजनविश्वातील कार्याबद्दल आणि त्यांच्या इतर सामाजिक कार्यांबद्दल ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. १३ मार्चला म्हैसूर विश्वविद्यालयाचे व्हॉइस चॅन्सलर प्रो. जी हेमंत कुमार यांनी याची घोषणा केली आहे. यावेळी ते म्हणाले की, “पुनीत राजकुमार यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील अभूतपूर्व योगदानाबद्दल आणि त्यांच्या सामाजिक कार्यांबद्दल या डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात येत आहे.”

पुनीत यांना मिळालेला हा सन्मान त्यांची पत्नी असलेल्या अश्विनी यांनी स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना त्या खूपच भावुक झाल्या होत्या. प्रो. जी हेमंत कुमार यांनी सर्वप्रथम अश्विनी यांची त्यांच्या घरी भेट घेतली आणि त्यांना हा पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली होती. मुख्य म्हणजे याआधी पुनीत यांच्या वडिलांना देखील या विश्वविद्यालयाकडून डॉक्तोरेत पदवी प्रदान करण्यात आली आहे.

तत्पूर्वी पुनीत राजकुमार यांचा ‘जेम्स’ (Puneeth Rajkumar Film James) हा सिनेमा १७ मार्चला त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी त्यांचे फॅन्स, कुटुंब सर्वच अतिशय भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पुनीत यांचा हा अखेरचा सिनेमा ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफ़ा प्रतिसाद दिला असून, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. हा सिनेमा पुदित यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित केला गेला. ‘जेम्स’ हा पहिला कन्नड सिनेमा ठरला ज्याने १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post