देशभरात सध्या निवडणूकांच्या निकालांची चर्चा रंगली आहे. यामध्ये पंजाब राज्यामध्ये आम आदमी पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. पंजाब राज्याचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांचे नाव चर्चेत आहे. ते मुख्यमंत्री पदावर बसणार असे जवळपास निश्चितच झाले आहे. चला तर एकेकाळी स्टँडअप कॉमेडियन ते मुख्यमंत्रीपद असा यशस्वी प्रवास करणार्या मान यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया…
आम आदमी पार्टीचे पंजाब इकाईचे मीडियामधील सल्लागार आणि माजी पत्रकार मंजीत सिंह सिद्धू हे भगवंत मान यांचे मित्र आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचा आणि सकारत्मक पैलू म्हणजे ते त्यांची बाजू मोठ्या ठामपणे मांडतात. ते ज्या जोशाने हजारो लोकांना भाषण देतात त्याच जोशाने ३/४ लोकांशी ते बोलतात. मनजीत सिद्धू यांच्या सांगण्यानुसार भगवंत मान यांना लोकं कॉमेडियन आणि नेता म्हणून तर ओळखतातच. मात्र, ते एक उत्तम कवी देखील आहे. मात्र, त्यांनी कधी त्यांच्या कवितांचे पुस्तक प्रकशित केले नाहीये.
राजकारणात आल्यानंतर त्यांना दारूचे व्यसन असल्याने विरोधकांनी त्यांची टर उडवली होती. या आरोपांना कंटाळून भगवंत मान यांनी जानेवारी २०१९ मध्ये आपच्या रॅलीत या विषयावर उघडपणे बोलले आणि त्यांनी आपण यापुढे कधीही दारूला हात लावणार नाही असा संकल्प केला होता.
भगवंत मान हे शिक्षण घेत असतानाच कॉमेडीच्या क्षेत्रात गेले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी कॉमेडीच्या आणि कवितेच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आणि ते व्यवसायाने कॉमेडियन झाले. त्यांच्या पहिल्या कॉमेडी आणि गाण्याचे मजेशीर व्हर्जनची पहिली कॅसेट १९९२ साली ‘गोबी दी ए कच्चिए व्यापारने’ नावाने आली आणि कॉमेडीच्या जगात प्रसिद्ध झाले. कॉमेडीमध्ये व्यस्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण मधेच सोडले. १९९२ ते २०१३ सालापर्यंत त्यांनी त्यांचे २५ कॉमेडीचा अल्बम रेकॉर्ड केले, तर त्यांनी त्यांच्या पाच गाण्यांची कॅसेट देखील प्रदर्शित केली. भगवंत मान यांनी १९९४ ते २०१५ पर्यंत १३ हिंदी चित्रपटांमध्ये आणि जाहिरातींमध्ये त्यांची कला दाखवली.
‘जुगनू’, ‘झंडा सिंह’, ‘बीबो बुआ’, ‘पप्पू पास’ आदी अनेक कॉमेडी पात्र जगाला भगवंत मान यांनीच दिले आहेत. त्यांनी जगतार जग्गी आणि राणा रणबीर यांच्यासोबत देखील कॉमेडी केली. भगवंत मान यांनी ‘जुगनू मस्त मस्त’ नावाचा टीव्ही शो आणि ‘नो लाइफ विद वाइफ’ नावाने स्टेज शो केले. भगवंत मान यांनी इंद्रजीत कौर यांच्याशी लग्न केले असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र त्यांची पत्नी मान यांच्यापासून लांब अमेरिकेत राहते, तर भगवंत मान हे त्यांच्या आईसोबत सतोज गावात राहतात.
महत्त्वाच्या बातम्या-