पंजाबमधील मानसा जिल्ह्यात पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूस वाला (Sidhu Moose Wala) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाबच्या भगवंत मान सरकारने त्याची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतरच गायक सिद्धू मूस वालावर हा हल्ला झाला. जखमी अवस्थेत त्याला मानसा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मानसा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. रणजीत राय यांनी सांगितले की, पंजाबी गायक सिद्धू मूस वालाला रुग्णालयात आणण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
#WATCH | Three people were brought to the hospital, out of which Sidhu Moose Wala was dead. After giving primary treatment, the two injured have been referred to a higher institute for further treatment: Dr Ranjeet Rai, Civil Surgeon, Mansa Hospital pic.twitter.com/3j0QAWkofh
— ANI (@ANI) May 29, 2022
मानसा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. रणजीत राय यांनी सांगितले की, “तीन जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यापैकी सिद्धू मुस वाला यांचा मृत्यू झाला. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.” (punjabi singer and congress leader sidhu moose wala shot dead)
यापूर्वीच एका वृत्तसंस्थेने सिद्धू मूस वाला याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचं वृत्त दिलं होतं. त्यानंतर पंजाबी गायकाला जखमी अवस्थेत मानसा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Punjab | Congress leader and Punjabi singer Sidhu Moose Wala was shot by unknown people in Mansa district, three people including Sidhu injured in the firing incident. Further details awaited.
— ANI (@ANI) May 29, 2022
काढून घेतली होती ४२४ लोकांची सुरक्षा
शनिवारीच (२८ मे) पंजाबच्या भगवंत मान सरकारने मूस वालासह इतर ४२४ लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. मूस वाला याने काँग्रेसच्या तिकिटावर मानसामधून विधानसभा निवडणूक लढवली होती. आम आदमी पक्षाचे (आप) डॉ. विजय सिंगला यांनी त्याचा पराभव केला. मूस वाला याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
The murder of Shri Sidhu Moose Wala, Congress candidate from Punjab & a talented musician, has come as a terrible shock to the Congress party & the entire nation.
Our deepest condolences to his family, fans & friends.
We stand united & undeterred, at this time of extreme grief. pic.twitter.com/v6BcLCJk4r
— Congress (@INCIndia) May 29, 2022
तसेच काँग्रेस पक्षाने मूस वालाच्या निधनाबद्दल ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसने ट्वीट केले की, “पंजाबमधील काँग्रेसचे उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार सिद्धू मूस वाला यांच्या हत्येने काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि मित्रांप्रती आमच्या मनापासून संवेदना.” दुसरीकडे, ही बातमी समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा