Tuesday, July 9, 2024

बॉलिवूडला हिट गाणी देणारा गायक झाला ५२ वर्षांचा; आपल्या मुलांना ठेवलंय सोशल मीडियापासून खूपच दूर

सध्या सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या मुलांना कधीच कॅमेर्‍यासमोर येऊ देत नाहीत. त्याच्या मुलांना ते सोशल मीडियापासून दूर ठेवणेच जास्त पसंत करतात. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती पंजाबचा प्रसिद्ध गायक जसबीर जस्सीची. 7 फेब्रुवारी रोजी जस्सीने त्याचा 52 वा वाढदिवस साजरा केला. जाणून घेऊया त्याच्याबद्दल.

सन 1998 मध्ये आलेल्या ‘दिल ले गई’ गाण्याने जसबीरला रातोरात स्टार केले होते. आजही या गाण्याची चर्चा पाहायला मिळते. आपल्या दमदार आवाजाने त्याने अनेक गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्यांची आणि बहारदार आवाजाची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा होत असते. सोशल मीडियापासून चार हात लांब राहणारा हा लोकप्रिय गायक आपल्या मुलांनाही कधीच माध्यमांसमोर येऊ देत नाही. त्याने आपले खासगी आयुष्य माध्यमांपासून लांब ठेवले आहे. याबद्दल बोलताना जसबीर म्हणतो की, “माझ्या मुलांनी स्वतःला स्टार समजावे असे मला कधीच वाटत नाही. यामुळे त्यांना दिखावा करण्याची सवय लागू शकते.”

जसबीरला साकार आणि जेरी सिंग नावाची दोन मुले असून दोघेही आपल्या वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात काम करत आहेत. साकार आणि जेरी दोघेही अमेरिकेत राहतात. साकार एक गायक आणि संगीत निर्माता आहे. त्याने अमेरिकेतील मोठ्या संगीत विद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे जेरीनेही लंडनमधून आपले संगीतातील शिक्षण पूर्ण केले आहे. 2020 मध्ये त्याने मॉडेल आणि गायिका दुआ लीपासोबत कामही केले आहे.

हेही पाहा- आरआरआर सिनेमातील Ajay Devgan आणि Alia Bhattच्या मानधनात तयार होऊ शकतो Bollywoodचा आख्खा एक चित्रपट?

आपल्या मुलांना यशाचे धडे देताना जसबीर म्हणतो की, “मी त्यांना सांगितले आहे यशस्वी होण्यासाठी कोणतेच शॉर्टकट वापरू नका. त्यामुळेच त्यांच्या गाण्यात आपल्या लोककलेचे दर्शन होते. मी त्यांना कधीही पार्टीत घेऊन जात नाही, कारण त्यांनी त्यांच्या पायावर उभे राहावे अशीच माझी इच्छा असते.”

दरम्यान जसबीरने बॉलिवूड सिनेमांसाठी अनेक लोकप्रिय गाणी गायली असून त्याची अनेक गाणी आजही प्रसिद्ध आहेत. त्याच्या गाण्यांमध्ये ‘कोका’, ‘कुडी गुजरात दी’, ‘लौंग दा लश्कारा’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा