Sunday, December 8, 2024
Home अन्य ‘व्हॅलेंटाईन डे’ आधी ‘काका’ घेऊन आले नवीन पंजाबी गाणे ‘तीजी सीट’, दोनच दिवसात ४० मिलियन्सचा टप्पा केला पार

‘व्हॅलेंटाईन डे’ आधी ‘काका’ घेऊन आले नवीन पंजाबी गाणे ‘तीजी सीट’, दोनच दिवसात ४० मिलियन्सचा टप्पा केला पार

पंजाबी गायक काका यांचे नवीन गाणे ‘तेजी सीट’ आत्ताच रिलीझ झाला आहे. रिलीझ झाल्या झाल्याचं या गाण्यानी धमाल उडवली आहे. यूट्यूबवर हे गाणं तिसऱ्या‌ क्रमांकाला ट्रेंड होत आहे. पंजाबी सिंगर काका आणि त्यांचे गाणे मागील काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहेत. त्यांची गाणी रिलीझ होताच पूर्ण धमाका उडून टाकत आहेत. ‘टेम्पररी प्यार’ आणि ‘लिबास’ याच्यानंतर आत्ताच्या काही दिवसात नवीन गाणे रिलीझ झाला आहे. ज्याचं नावच ‘तीजी सीट’ हे आहे. 6 फेब्रुवारीला रिलीझ झालेल्या या गाण्याचे व्ह्यूज दोन दिवसात 40 लाख पार करून गेले आहे.

एवढंच नाही हे गाणे यूट्यूबवर तिसऱ्या नंबरवर ट्रेंड करत आहे. याच्यामध्ये काकांसोबत ‘आकांशा सिरण’ आहे, जीची सुंदरता तुमचं मन जिंकून घेईल. या गाण्यामध्ये असे दाखवले आहे कि, कसे काका आकांशाला बघून तिच्यासोबत रोमँटिक सीनचे स्वप्न बघतात. पूर्ण गाणं त्यांच्या स्वप्नावरचं बनवले आहे. जे स्वप्न शेवटी तुटून जाते. गाण्याचे लिरिक्स सुद्धा काकांनीच लिहिले आहे.

काकांचा जन्म पंजाबमध्ये ‘चंदूमाजरा’ येथे झाला होता. चंदूमांजरा मध्येच काकांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. काकांना लहानपणापासूनच गाणे म्हणण्याची खूप आवड होती. आणि तेव्हापासूनच ते सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत आले आहेत.

काकांमध्ये मजेशीर गोष्ट ही आहे की, ते फक्त गाणे गात नाहीत तर त्याचे लिरिक्स सुद्धा स्वतः लिहितात. काकांनी तशी त्यांच्या करिअरची सुरुवात 2019 मध्ये केली होती. परंतु त्यांना 2020 मध्ये प्रसिध्दी मिळाली. याच्या आधी काकांचे भोलेनाथ हे गाणे सुद्धा बरेच लोकप्रिय झाले होते. त्याच्यानंतर काकांनी एकानंतर एक अशी बरीच सुपरहिट गाणी बनवली आहेत. त्यानंतर एका वर्षाच्या आत काकांच्या प्रसिद्धीमध्ये खूपच वाढ झाली आहे.

हेही वाचा-

गुरु रंधावाच्या ‘या’ गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा