गुरु रंधावाच्या ‘या’ गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात

Mehendi Wale Haath Song By Guru Randhawa Goes To Viral


पंजाबी सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत गायक गुरु रंधावा याने आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. ‘तुम्हारी सुलू’ आणि ‘साहो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भन्नाट गाणे दिल्यानंतर तो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. त्याला सोशल मीडियावर करोडो चाहते फॉलो करतात. त्याच्या प्रत्येक गोष्टीवरही चाहते आपली नजर ठेवत असतात. नुकतेच रिलीझ झालेले त्याचे ‘मेहेंदी वाले हात’ गाणे सोशल मीडियावर धमाल करत आहे. यादरम्यानच या गाण्याचा मेकिंग व्हिडिओदेखील रिलीझ केला आहे.

या गाण्यात गुरुसोबत बॉलिवूड अभिनेत्री संजना सांघीदेखील दिसत आहे. गाणे रिलीझ केल्यानंतर, या गाण्याचा मेकिंग व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. चाहते व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. सोबतच प्रशंसाही करत आहेत.

टी- सीरिजद्वारे काही तासांपूर्वीच यूट्यूबवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

गुरु रंधावाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

संजना सांघीने बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या शेवटच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. पहिल्यांदा टी- सीरिजच्या म्यूझिक व्हिडिओमध्ये आणि गुरु रंधावासोबत पहिल्यांदाच दिसणारी संजनाने ती खूप खुश असल्याचेही सांगितले आहे.

गुरु रंधावाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहे. त्यामध्ये ‘मोरनी बनके’, ‘बन जा राणी’, ‘इन्नी सोनी’, अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे.

हेही वाचा-

कपिलने गुरु रंधावाला करून दिली ‘त्या’ पार्टीची आठवण अन् क्षणात गायकाचा चेहरा झाला लालेलाल; वाचा संपूर्ण प्रकरण

गायक गुरु रंधावाने गुपचूप उरकवला साखरपुडा, पाहा कोण आहे होणारी पत्नी?


Leave A Reply

Your email address will not be published.