Thursday, January 2, 2025
Home बॉलीवूड ‘शोले’ चित्रपटात सांभाची भूमिका निभावलेल्या अभिनेत्याने ‘त्या’ एका डायलॉगसाठी केला तब्बल २७ वेळा ‘मुंबई ते बँगलोर’ प्रवास

‘शोले’ चित्रपटात सांभाची भूमिका निभावलेल्या अभिनेत्याने ‘त्या’ एका डायलॉगसाठी केला तब्बल २७ वेळा ‘मुंबई ते बँगलोर’ प्रवास

‘पूरे पचास हजार’ हा डायलॉग तर सगळ्यांना आठवत असेलच आणि आठवणार तरी का नाही? एके काळी खलनायकाच्या भूमिकेत सगळ्यांच्या मनावर हा डायलॉग राज्य करत होता. याच एका ओळीने तो अभिनेता अमर झाला. हो आपण शोले या चित्रपटातील ‘सांभा’ या पात्राबद्दल बोलत आहोत. अभिनेता मॅकमोहन यांनी शोले या चित्रपटातील सांभा हे खलनायकाचे पात्र निभावून सगळ्यांना त्यांच्याकडे आकर्षित केले. उत्तम बांधा, योग्य संभाषण शैली आणि दमदार अभिनयामुळे त्यांना या चित्रपटाने ओळख निर्माण करून दिली.

पाहायला गेलं, तर मॅकमोहन यांनी ‘डॉन’, ‘कर्ज’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘जंजीर’, ‘रफुचक्कर’, ‘शान’ यांसारख्या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. परंतु त्यांना खरे नाव आणि ओळख मिळाली ती म्हणजे ‘शोले’ या चित्रपटातून. या चित्रपटातील त्यांचा ‘पूरे पचास हजार’ हा डायलॉग खूपच लोकप्रिय झाला होता. त्यांचा हा डायलॉग आजही सगळीकडे प्रसिद्ध आहे. परंतु ही गोष्ट जाणून तुम्ही हैराण व्हाल की, या तीन शब्दाच्या डायलॉगसाठी मॅकमोहन यांना 27 वेळा ‘मुंबई ते बेंगलोर’ हा प्रवास करावा लागला होता.

या चित्रपटाच्या सुरुवातीला त्यांचे पात्र खूप होते, पण एडिटिंगमध्ये त्यांचे केवळ हे तीन शब्द ठेवण्यात आले. जेव्हा त्यांनी पाहिले, तेव्हा त्यांना खूपच दुःख झाले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मॅकमोहन यांनी सांगितले की, “मी जेव्हा चित्रपट पाहिला, तेव्हा मला खूपच रडायला आले, मग सरळ दिग्दर्शक महेश सिप्पी यांच्याकडे गेलो. मी रागात त्यांना म्हणालो, माझा एवढा छोटा रोल का ठेवला. तुम्हाला पाहिजे होता तर हा पण सीन कट करायचा ना. त्यावर ते फक्त एवढंच म्हणाले की, जर हा चित्रपट हीट झाला, तर संपूर्ण जग तुला ‘सांभा’ या नावाने ओळखले. पुढे जाऊन अगदी तसचं झालं.”

मॅकमोहन यांनी 1964 मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या बॉलिवूडमधील करिअरमध्ये त्यांनी 200 पेक्षाही अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी शोले सोबतच अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. त्यांनी 46 वर्ष चित्रपटसृष्टीत काम केले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुशांतच्या मृत्यूचा धक्का आजही पचवू शकली नाही अंकिता, मुलाखतीत सांगितल्या ‘या’ गोष्टी

-आमिर खाननंतर आता आर माधवनही झाला कोरोना पॉझिटिव्ह, अभिनेत्याने मजेशीर अंदाजात  दिली माहिती

-धक्कादायक! रिक्षामध्ये सापडला अभिनेत्याचा मृतदेह, दीर्घ काळापासून होता आर्थिक अडचणीत

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा