Tuesday, July 1, 2025
Home मराठी ‘मी गेल्यावर कोण कोण यायचं याची लिस्ट देऊन’ पुष्कर जोगची धक्कादायक पोस्ट

‘मी गेल्यावर कोण कोण यायचं याची लिस्ट देऊन’ पुष्कर जोगची धक्कादायक पोस्ट

पुष्कर जोग हा अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटांमध्ये काम करत आहे. ‘जबरदस्त’ या सिनेमातून प्रसिद्ध झालेल्या पुष्करने इतरही अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे केली आहेत. तो सोशल मिडीयावर देखील सक्रीय असतो. त्याच्या नवीन सिनेमा बरोबरच त्याच्या पर्सनल लाईफ विषयी देखील चाहत्यांना तो अपडेट देत असतो. सध्या पुष्करच्या एका पोस्टने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पुष्करने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल स्टोरी शेयर केली आहे. या स्टोरी मध्ये तो म्हणतो की, सगळ्यांसाठी सगळं केलं, खरा वागलो… जेव्हा जेव्हा मेंटली खचतो, तेव्हा तेव्हा शोधतो, आपले कोण कोण, आई आणि मुलगी, नशीबवान आहेत ती लोकं  ज्यांना खरे काळजी घेणारे मित्र भेटले आहे. जिवंत असताना मी एकटाच राहीन बहुतेक. मी गेल्यावर कोण कोण यायचं याची लिस्ट देऊन जाईन मी. उगाचच किती वाईट वाटलं ह्याचा आव आणू नये. पण, अजून बारा वर्षे आहेत. राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्कर जिंकायचं आहे. माझ्या मराठी फिल्म्स साठी … लिजेंड होऊनच जाईन. लव्ह यु आई आणि फेलीशा … त्या सगळ्यांना आणि वेळेलाही धन्यवाद ज्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले. 

पुष्करने याव्यतिरिक्त काही पोस्ट सुद्धा शेयर केल्या आहेत. या पोस्ट मध्ये तो म्हणतो, मानो या ना मानो… खूप मोठा जलवा करूनच जाणार … माझे कुटुंबीय आणि माझ्या देशाला अभिमान वाटावं असं … ऑस्कर मध्ये एक दिवस मराठी आणि हिंदी मध्ये भाषण देणार. एका वेगळ्या पोस्ट मध्ये त्याने एक फोटो शेयर केला आहे. त्यात तो म्हणतो, थकतोय मी परमेश्वरा… एकटा लढतोय … खूप वापरून घेतात … खूप फसवतात… मी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत कायम लढत राहीन. 

यावरून हे तरी नक्कीच स्पष्ट आहे कि पुष्कर सध्या आयुष्यात एका अवघड फेज मधून जात आहे. पुष्कारचे नवीन सिनेमे देखील येत राहतात. सप्टेंबर महिन्यात त्याचा नवा चित्रपट धर्मा – द एआय स्टोरी प्रदर्शीत होणार आहेत. प्रेक्षाकी हा सिनेमा कसा स्वीकारतात हे बघावं लागेल.     

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –   

कल्की करणार नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत काम ! शेक्सपियरच्या ‘किंग लिअर’ नाटकावर आधारित…    

हे देखील वाचा