Monday, July 1, 2024

अबब! तब्बल ४०० कोटींमध्ये बनणार ‘पुष्पा टू’, ‘या’ महिन्यात होणार रिलीज

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) स्टारर दिग्दर्शक सुकुमार यांच्या पुष्पा २ ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या बंपर यशानंतर आता या चित्रपटाच्या दुसरा भाग पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर दुसरा भाग लवकरात लवकर चित्रपटगृहात नेण्याची तयारी सुरू होती. नंतर, RRR आणि KGF 2 चे ब्लॉकबस्टर यश पाहिल्यानंतर, दिग्दर्शक सुकुमार यांच्या पुष्पा 2 चित्रपटाबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या समोर येऊ लागल्या. असे म्हटले जाते की RRR आणि KGF 2 चे प्रचंड यश पाहून दिग्दर्शक सुकुमार पुष्पा 2 ची स्क्रिप्टिंग आणखीनच दर्जेदार करताना दिसत आहेत. 

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला पुष्पा द राईज चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर पुढच्या भागाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली होती. समोर आलेल्या बातम्यांनुसार पहिल्या पुष्पापेक्षा या चित्रपटाची कथा दर्जेदार करण्याचा निर्धार दिग्दर्शकांनी केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण यापूर्वी मार्चच्या अखेरीस सुरू होणार होते. ज्यामध्ये सतत विलंब होत होता आणि चित्रपट अद्याप फ्लोरवर जाऊ शकला नाही. आता माध्यमांमधील बातम्यांनुसार सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 ची शूटिंग या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंतच सुरू होऊ शकेल. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेला बराच विलंब होत आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, पुष्पा 2 पुढील वर्षी डिसेंबर 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरूवातीस रुपेरी पडद्यावर येईल. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना पुष्पा 2 साठी खूप वाट पाहावी लागणार आहे. . पुष्पा २ ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची ही बातमी नक्कीच निराशा करणार आहे.

दरम्यान चित्रपटात दाक्षिणात्य स्टार  विजय सेतुपती अल्लू अर्जुन-रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म पुष्पा 2 मध्ये प्रवेश करणार आहे.विजय सेतुपतीही या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसे, विजय सेतुपती यांना चित्रपटाची ऑफर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी या अभिनेत्याला पुष्पाच्या पहिल्या भागात पोलिसाची भूमिकाही ऑफर करण्यात आली होती. जो त्याने त्यावेळी नाकारली होती. नंतर फहद फासीलने ही व्यक्तिरेखा साकारली. आता दुसऱ्या भागात विजय सेतुपती फहद फासिलला कशी टक्कर देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा