बॉलिवूडमध्ये रुपाची खाण असलेल्या अनेक अभिनेत्री आहेत. याच अभिनेत्रींसोबत लग्न करून आपली लाईफ सेट करावी, अशी अनेकांची इच्छा असते. पण असेही काही नग आहेत, ज्यांनी यांचं मन जिंकलंही आहे आणि नंतर त्यांनाच पाठ दाखवून दुसऱ्या अभिनेत्रींसोबत लफडंही केलंय. अशीच एक मन दुखावली गेलेली अभिनेत्री आहे दीपिका पदुकोण. तिचे मन दुखावणारा तो अभिनेता म्हणजे रणबीर कपूर.
दीपिकानं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, मी रणबीरला रंगेहात पकडलं होतं. तसंच ती म्हणाली होती, माझ्यासाठी सेक्स हे फक्त शारीरिक संबंध नसून एक इमोशनल अटॅचमेंट असते. हे शब्द पुरेसे आहेत, दीपिकाला हे सांगण्यासाठी की, तिनं रणबीरला कशाप्रकारे रंगेहात पकडंल असेल. आज या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत.
दीपिका आणि रणबीर म्हणजे एकेकाळच्या बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक जोड्यांपैकी एक. त्यांची मैत्री २००८ साली आलेल्या ‘बचना ए हसीनो’ या सिनेमादरम्यान झाली होती. दोघांनीही या सिनेमात एकत्र काम केलं होतं. एकत्र बराच वेळ घालवला होता. ही ती दोघांच्या नात्याची सुरुवात. दीपिका रणबीरवर जीवापाड प्रेम करायची. ती खूप प्रेमाने रणबीरची काळजी घेत होती. त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत होती. इतकंच नाही, तर रणबीरवरील आपलं प्रेम दाखवण्यासाठी तिनं थेट आपल्या मानेवर त्याच्या नावाचा टॅट्यू बनवला होता. दीपिकानं रणबीरवर जीव ओवाळून टाकला होता. त्याबदल्यात तिला रणबीरकडून लग्न, प्रामाणिकपणा आणि इतर कोणत्याही मुलीकडं न जाण्याचं वचन हवं होतं. पण त्यातही रणबीरनं मातीच खाल्ली. त्यानं दीपिकाला हेच वचन दिलं नाही.
यानंतर दीपिकाला रणबीरवर शंका येऊ लागली. जेव्हा तिला पहिल्यांदा रणबीरवर शंका आली, तेव्हा असं म्हटलं जातं की, रणबीरनं दीपिकालाच त्यासाठी जबाबदार ठरवले आणि म्हटले की, तू चुकीचा विचार करतेय, निगेटिव्ह आहेस आणि नॅरो माइंडेड आहेस. त्यावेळी दीपिकाला वाटलं की, माझंच काहीतरी चुकलंय आणि हे रिलेशन चुकीच्या पद्धतीने हँडल करत आहे. दीपिकानं पुढं स्वत:मध्ये सुधारणा केली. पण परत दीपिकाला समजलं की, रणबीर आपल्या दुसऱ्या सिनेमाच्या को-ऍक्ट्रेससोबत खूपच जवळीक साधतोय, आणि त्याचवेळी दीपिकानं ठरवलं की, आता बास झालं. आता ती रणबीरकडून कोणतीही कहाणी ऐकणार नाही. थेट त्या ठिकाणी जाऊन त्याला रंगेहात पकडेल, आणि त्याला म्हणेल की, तूच चुकीचा आहेस, मी नाही.
ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा रणबीर कॅटरिनासोबत राजनीती या सिनेमाची शूटिंग करत होता. या सिनेमाचे डिरेक्टर प्रकाश झा होते. या सिनेमाचं एक स्केड्युल भोपालमध्ये ठेवण्यात आलं होतं. रणबीर भोपालमध्ये पोहोचला, कॅटरिना तिथंच होती. सेटवर जास्त वेळ एकत्र घालवला आणि शूटिंग संपल्यानंतरही तो कॅटरिनासोबतच वेळ घालवायचा. त्यावेळी क्रूमेंबर आणि सेटवर उपस्थित इतर लोक हे पाहून हैराण झाले होते. हे तर सोडाच. रणबीरच्या स्वत:च्या टीममधील लोकही हे पाहून अवाक् झाले होते की, एकीकडं हा दीपिकाला डेट करतोय आणि इकडं कॅटरिनासोबत जवळीक साधतोय. तिथंच एक व्यक्ती होता, जो दीपिकाचाही खास होता. त्यानं वेळ न घालवता दीपिकाला फोन केला आणि भोपाळमध्ये खूप काही सुरू असून तू इथे येऊन स्वत:च्या डोळ्यांनी पाहा. मग दीपिकानं यावेळी रणबीरला काहीच न कळवता थेट भोपाळ गाठायचं ठरवलं. दीपिका मुंबईवरून फ्लाईटने भोपाळला पोहोचली, जिथे राजनीती सिनेमाची शूटिंग सुरू होती.
तिथं पोहोचल्यानंतर दीपिकानं जे काही पाहिलं, ते पाहून त्यांचं रिलेशन तिथंच संपलं. मग दीपिकाला समजलं की, तिची चूक एवढीच होती की, तिनं पहिल्यांदाच विश्वास नव्हता करायला पाहिजे. जर तिनं पहिल्यांदाच विश्वास ठेवला नसता, तर तिचा हा दुसरा मोठा विश्वासघात झाला नसता. जेव्हा तिच्याशी दुसरा विश्वासघात झाला, तेव्हा तिसऱ्या विश्वासघातासाठी तिनं चान्सच दिला नाही, तिनं तिथंच ब्रेकअप केला. या ब्रेकअपनंतर दीपिकावर मोठा आघात झाला होता. ती थेट डिप्रेशनमध्ये गेली होती.
खूप त्रासानंतर ती डिप्रेशनमधून बाहेर आली, आणि नंतर तिनं दीपिकाने रणवीर सिंगसोबत नोव्हेंबर २०१८मध्ये लग्नगाठ बांधली.
हेही पाहा- आणि थेट सेटवर पोहोचत दीपिकाने रणबीर-कॅटरिनाला पकडलं रंगेहात
जशी दीपिकाची कहाणी आहे, तशीच कॅटरिनाचीही आहे. तीपण रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. एका ठिकाणी जाऊन त्यांचंही ब्रेकअप झालं. आणि त्यानंतर कॅटरिनाने थेट विकी कौशलसोबत लग्न केलं. त्यांचं लग्न नुकतंच ९ डिसेंबर, २०२१ रोजी थाटामाटात पार पडलं.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-