Friday, July 5, 2024

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’मध्ये अर्जुन कपूर खलनायक होणार का? निर्मात्याचे ‘हे’ विधान आलं समोर

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज‘(Pushpa :The Rise) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ निर्माण केला आहे. पुष्पा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता ‘पुष्पा’चे चाहते या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा 2 बद्दल रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. नुकतीच अभिनेत्री रश्मिका मंदान्ना(Rashmika mandanna) हिने चित्रपटाच्या शूटिंगची माहिती शेअर केली आहे. याशिवाय या चित्रपटात अर्जुन कपूरची उपस्थिती असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत, ज्यावर आता निर्मात्यांचे वक्तव्य समोर आले आहे.

अलीकडेच बॉलिवूडमधील अभिनेता अर्जून कपूर(Arjun Kapoor) ‘पुष्पा 2’ मध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक सुकुमार सध्या अर्जुन कपूरच्या संपर्कात असून ते या सिक्वेलमध्ये पोलिसाच्या भूमिकेमध्ये दिसू शकतो असे म्हटले जात होते.

अलीकडेच बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता ‘पुष्पा 2’ मध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक सुकुमार सध्या अर्जुन कपूरच्या संपर्कात असून ते या सिक्वेलमध्ये पोलिसाच्या भूमिकेमध्ये दिसू शकतो असे म्हटले जात होते. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखातीमध्ये, निर्माते नवीन येरणेनी यांनी यावर “ही एक अफवा आहे” असे वक्तव्य केले. तुम्हाला खोटी बातमी मिळाली आहे. ‘फहाद फाझिल या चित्रपटामध्ये पोलिस अधिकाऱ्याचे भूमिका साकारत आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शूटिंगला सुरुवात होणार आहे. हैदराबादमध्ये निश्चित केलेले सीन्स शूट झाल्यावर आम्ही उरलेले सीन्स अन्य लोकेशन्सवर जाऊन शूट करणार आहोत’.

दरम्यानच्या काळात अभिनेत्री साई पल्लवी पुष्पा 2 मध्ये दिसणार आहे. तेव्हा निर्माते रवी शंकर यांनी या अफवांचे खंडन केले होते. या चित्रपटामध्ये कोणते नवे कलाकार दिसू शकतात याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड प्रमाणामध्ये उत्सुकता आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘पुष्पा १’ मध्ये श्रीवल्ली हे पात्र साकारले होते. रश्मिकाने ‘गुडबाय’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. हे कार्यक्रम संपल्यानंतर ती ‘पुष्पा २’ च्या चित्रीकरणासाठी हैदराबादला जाणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रदर्शनापूर्वीच ‘आदिपुरुष’ वादाच्या भोवऱ्यात, दिल्ली कोर्टात बंदीच्या मागणीची याचिका दाखल

केबीसीमध्ये जया बच्चन यांनी केला असा खुलासा, बिग बीच्या अश्रूचा बांध फुटला!

हे देखील वाचा