अभिनेते येतात, जातात. काही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होतात, तर काही अपयशी ठरतात. यशस्वी ठरणारे असे काही अभिनेते असतात, जे सदैव आठवणीत राहतात. त्यांची गाणी, चित्रपट नेहमीच त्यांची आठवण काढण्यासाठी प्रवृत्त करतात. असेच अभिनेते म्हणजे भारतीय सिनेमाचे ‘पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना होय. राजेश खन्ना यांनी एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटांतील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे, त्यांच्या कहाणीसोबतच डायलॉग्ज आणि गाणीही सुपरहिट व्हायचे. काही डायलॉग्ज तर आजही प्रसिद्ध असून चाहत्यांच्या ओठांवर आहेत. यामध्ये सन १९७२ साली शक्ती सामंता यांनी दिग्दर्शित केलेला ‘अमर प्रेम’ या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाची कहाणी, कलाकारांचा दमदार अभिनय, संगीत आणि डायलॉग्ज सर्वकाही चाहत्यांच्या ओठांवर होता. चला तर मग आज याच चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगमागील रंजक कहाणीबद्दल जाणून घेऊया…
या चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत अभिनेत्री शर्मिला टागोरही मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्ज सुपरहिट ठरले होते. तसं पाहिलं तर यामधील प्रत्येक गोष्टच खास आहे. परंतु यातील प्रसिद्ध डायलॉग ‘पुष्पा आय हेट टिअर्स’ आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. या चित्रपटाला रिलीझ होऊन ४९ वर्षे झाली आहेत. परंतु याव्यतिरिक्त चित्रपट अपूूर्ण असल्याचे दिसते.
‘अमर प्रेम’ चित्रपटाचे डायलॉग लेखक अरविंद मुखर्जी हे मूळ बंगाली होते. त्यांची हिंदी फार चांगली नव्हती. असेही म्हटले जाते की, त्यांनी चित्रपटाचा स्क्रीनप्ले इंग्रजीमध्ये लिहिला होता. त्यानंतर पूर्ण स्क्रीनप्लेचा हिंदी अनुवाद केला गेला होता. याचा अनुवाद लेखक रमेश पंत यांनी केला होता. त्यांनी चित्रपटातील सर्व अनुवाद हिंदीमध्ये केले होते. परंतु जेव्हा ‘पुष्पा आय हेट टिअर्स’ची वेळ आली, तेव्हा त्यांनी त्याचे हिंदीत अनुवाद न करता इंग्रजीतच ठेवला.
https://youtu.be/zN5pbv6AV8Q
त्यावेळी कदाचित त्यांना हा अंदाज नव्हता की, त्यांचा हा निर्णय चित्रपटप्रेमींना किती आवडेल. हा डायलॉग राजेश खन्ना यांनी शर्मिला यांना आपल्या त्याच अंदाजात म्हटला आणि ही ओळ नेहमीसाठी चाहत्यांच्या मनात कोरली गेली. आजही जेव्हा कोणी आपले रडताना पाहतात, तेव्हा एकदातरी नक्कीच म्हणतात की, ‘पुष्पा आय हेट टिअर्स.’
‘अमर प्रेम’ चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा चित्रपट ‘निशिपद्मा’ या बंगाली चित्रपटावर आधारित होता. असे म्हटले जाते की, आनंद बाबूची भूमिका साकारण्यापूर्वी राजेश खन्ना यांनी बंगाली चित्रपट जवळपास २४ वेळा पाहिला होता. खरं तर ‘अमर प्रेम’ चित्रपट बॉलिवूडमध्ये जबरदस्त हिट झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘त्या’ व्यक्तीची नजर ‘विशाल वीरु देवगन’वर पडली अन् इंडस्ट्रीला अजय देवगन मिळाला, नाहीतर…