Monday, March 4, 2024

‘त्या’ व्यक्तीची नजर ‘विशाल वीरु देवगन’वर पडली अन् इंडस्ट्रीला अजय देवगन मिळाला, नाहीतर…

बॉलीवूडमधील सिंघम म्हणून ओळखला जाणाऱ्या अजय देवगनची गणना अष्टपैलू अभिनेता म्हणून केली जाते. अजयने असंख्य चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. गंभीर, ऍक्शन, विनोदी आदी सर्व भूमिका साकारून अजय दोन दशकांपासून आपले मनोरंजन करत आहे. जिवंत आणि प्रभावशाली अभिनय करणाऱ्या अजयने स्वबळावर आणि मेहनतीने या क्षेत्रात त्याचे स्थान पक्के केले. आज अजय त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने राज्याच्या कारकिर्दीवर टाकलेला हा एक प्रकाश.

अजयचा जन्म 2 एप्रिल 1969 साली दिल्लीमध्ये झाला. अजयचे वडिल वीरू देवगन हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टंटमॅन होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये स्टंट डिरेक्टर म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच अजयच्या घरात चित्रपटाचे वातावरण होते. त्यामुळे अजयने देखील दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पाहिले. अजयचे खरे नाव विशाल वीरू देवगन असे होते. मात्र चित्रपटांमध्ये येताना त्याने आईच्या सांगण्यावरून अजय हे नाव लावले.

अजयने मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून त्याची पदवी संपादन केली आणि त्याने शेखर कपूर यांना त्यांच्या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. यादरम्यान कुकु कोहली यांनी अजयला पाहिले आणि त्याला त्यांच्या चित्रपटासाठी मुख्य नायकाची भूमिका ऑफर केली. 1991 साली अजयने ‘फुल और कांटे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले.

अजयला या सिनेमासाठी फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर अजयने कधीच मागे वळून पाहिले नाही. या सिनेमातील त्यांची एन्ट्री असणारा दोन बाइकवरून दमदार अंदाजमध्ये येणारा अजय त्याकाळी तर सर्वांनाच भावला मात्र आजही आजही ती स्टाइल त्यांच्या चित्रपटांमध्ये वेगळ्या पद्धतीने वापरली जाते.

अजयने या चित्रपटांनंतर अनेक सिनेमे केले ज्यांमुळे त्याची इमेज ही एका ऍक्शन हिरोची तयार झाली. 1998 साली महेश भट्ट यांच्या ‘जख्म’ सिनेमात अजयच्या अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. पुढ्याच्याच वर्षी म्हणजे 1999 साली अजय संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमात दिसला. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करूनही अजयने त्या सिनेमातून त्याच्या अभिनयाची छाप रसिकांवर पडली. हा सिनेमा अजयच्या करियरला एक वळण देणारा ठरला.

पुढे 2002 साली ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’ या सिनेमात अजय भगतसिंग या भूमिकेत झळकला. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेयरचा समीक्षकांच्या उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार तर मिळला सोबत राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. या चित्रपटातून अजयने त्याच्या अभिनयाच एका वेगळा आणि अनोखा पैलू सर्वांसमोर आणला.

अजयने कधीच एका चौकटीत न अडकता सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. अजय जास्तकरून त्याच्या ऍक्शन सिनेमांसाठी ओळखला जायचा. मात्र यासोबतच त्याने विनोदी, नकारात्मक, भावनिक, ऐतिहासिक आदी सर्व प्रकारच्या भूमिका अगदी सहजतेने निभावल्या. अजयने आतापर्यंत लीजेंड ऑफ भगत सिंह, रेनकोट, गंगाजल, युवा, अपहरण, ओमकारा, गोलमाल, वन्‍स अपॉन अ टाइम इन मुंबई, राजनीति, सिंघम, सन ऑफ सरदार, बादशाहो, शिवाय, रेड, संग्राम, विजयपथ, दिलवाले, सुहाग, नाजायज, दिलजले, हम दिल दे चुके सनम, इश्क, दिलवाले, टोटल धमाल, आदी असंख्य चित्रपटांमध्ये काम केले.

हिंदी सिनेसृष्टीमधे अजय आणि रोहित शेट्टी यांची जोडी म्हणजे चित्रपट हिट असे समीकरण बनली आहे. या जोडीने आतापर्यंत जमीन, गोलमाल सिरीजच्या सिनेमांपासून ते सिंघम सिरिजपर्यंत सर्व सुपरहिट सिनेमे दिले. अजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अजयने अभिनेत्री काजोलसोबत 1999 साली लग्न केले. या दोघांची पहिली भेट ‘हलचल’ चित्रपटाच्या दरम्यान झाली. त्यानंतर त्यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केले आणि मग लग्न केले. त्यांनी लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने केले हे विशेष. या दोघांना न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत.

अजय देवगण याच्या अफेयरच्या देखील अनेक चर्चा मीडियामध्ये रंगल्या होत्या. अगदी करिष्मा कपूरपासून ते रकुल प्रीत कंगना राणावतपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले. मात्र यातील सत्यता कधीच माध्यमांसमोर आली नाही. त्यातही करिष्मा कपूरसोबत अजयचे नाते अनेक मोठ्या पार्ट्या, मासिके आणि वृत्तपत्रांचा आवडता विषय होता.

अजय देवगनच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर मीडिया रिपोर्टनुसार अजय हा इंडस्ट्रीमधला पहिला असा अभिनेता आहे, ज्याने स्वतःचे खासगी जेट खरेदी केले आहे. अजयला 2016 भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ या मानाच्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.

अजयला त्याच्या वाढदिवसाच्या दैनिक बोंबाबोंबकडून हार्दिक शुभेच्छा.(ajay devgan birthday special know unknown facts aboaut him)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इंटरनेशनल ट्रांसजेंडर डे ऑफ व्हिजिबलीटी दिवसाच्या निमित्ताने सुश्मिता सेनच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष

रामलीला सिनेमाच्या सेटवरचे ‘ते’ चित्र पाहत शरद केळकर म्हणाला होता ‘भन्साळी किती पैसे वाया घालवतात यात मी…’

हे देखील वाचा