नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ चित्रपट सध्या चिञपटगृहात प्रचंड धुमाकुळ घालत आहे. या समोर दुसऱ्या चित्रपटांचे आव्हान नसले, तरी चि़ञपटाची पुढील वाटचाल माञ सर्वस्वी कोरोनाच्या प्रादूर्भावावर अवलंबून आहे. ज्या राज्यांमध्ये चिञपट चांगली कमाई करत आहे, तिथे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यास किंवा चिञपगृहे बंद झाल्यास त्याचा थेट परीणाम ‘पुष्पा’च्या कमाईवर होणार आहे.
प्रदर्शित होऊन तिन आठवडे झालेला अल्लू अर्जुनचा (allu arjun) बहूचर्चित ‘पुष्पा : द राईज पार्ट वन’ ने हिंदी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत सर्वांना चकित केले आहे. कोरोना व्हायरसमुळे वाढते प्रतिबंध आणि काही हिंदी भाषिक राज्यांमध्ये चिञपटगृह बंद झाली असतानाही चिञपटाचा प्रवास जोरदार सुरू असून कमाईचा ७० करोडचा आकडाही पार केला आहे. (pushpa movie bos office income may decrease due to corona)
१७ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ने विसाव्या दिवशी म्हणजे ५ जानेवारीला २.२५ करोडची कमाई केली. त्यानंतर चिञपटाची २० दिवसांची कमाई ७०.४४ करोड इतकी झाली आहे. चिञपटाने तिसऱ्या दिवशी शुक्रवारी ३.५० करोड, शनिवारी ६.१० करोड कमावले होते. यानंतर कामकाजांच्या दिवशी चिञपटाच्या कमाईध्ये घसरण दिसून आली. परंतु कमाई वेगाने वा़ढत आहे. सोमवारी चि़ञपटाने २.७५ करोड आणि मंगळवारी २.५० करोड जमवले होते. ‘पुष्पा’ चिञपटाकडे हिंदी भाषिक प्रेक्षकांची असलेली ओढ चकित करणारी आणि दिलासा देणारी आहे.
‘पुष्पा’ समोर सध्या दुसऱ्या चिञपटाच आव्हान नसले तरी, पु़ढील प्रवास माञ कोरोनाच्या प्रादुर्भावावर अवलंबून आहे. ज्या राज्यांत चिञपटाची कमाई चांगली आहे, तिथे प्रतिबंध वाढल्यास किंवा सिनेमागृहे बंद झाल्यास त्याचा थेट परीणाम कमाईवर होणार आहे. चौथ्या आठवड्यात हेच मोठे आव्हान ‘पुष्पा’समोर असणार आहे. परंतु मागच्या काही वर्षांमध्ये हिंदीत प्रदर्शित झालेल्या दाक्षिणात्य चिञपटांचा विचार केल्यास ‘पुष्पा’ सर्वात जास्त कमाई करणारा पाचवा चिञपट ठरला आहे. हिंदीमध्ये सर्वात जास्त कमाई करणार्या चिञपटाध्ये एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहूबली २ द कन्क्लूजन’ चिञपटाचा समावेश आहे. ज्याची फक्त हिंदी भाषेतील कमााई ५११ करोड इतकी आहे. हा विक्रम मोडणे सध्यातरी अशक्य आहे. डबिंग चिञपट सोडाच ,हिंदी चिञपटालाही हा विक्रम मोडणे कठीण आहे.
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर ‘२.०’ या तमिळ चिञपटाचा हिंदी रिमेक समाविष्ट आहे, ज्याने १८८ करोडची कमाई केली होती. ज्यामध्ये रजनीकांतसोबत अभिनेता अक्षयकुमारही मुख्य भूमिकेत दिसुन आला होता.
हेही वाचा :