वैभव तत्ववादीने केला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा, म्हणाला ‘तिचे लग्न…’

वैभव तत्ववादीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचा दमदार अभिनय पर्सनालिटीमुळे त्याचे खूप मोठे चाहते आहेत. वैभवने आपल्या अभिनयाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टितून केली त्याचे या सृष्टीत पदार्पण मालिका क्षेत्रातून झालेले आहे. मालिका त्यानंतर चित्रपटसृष्टी त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टी मॉडेलिंग ऍडव्हटाझिंग या सर्व क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला आहे. या चित्रपटसृष्टीत आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल खूप कमी लोक व्यक्त होतात वैभव तत्ववादीशी बोलताना पहिल्यांदाच त्याने वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले.

या क्षेत्रात काम करत असताना कलाकारांना रिलेशनशिप आणि त्याबाबतच्या गोष्टी या काटेकोरपणे जपाव्या लागतात. कधीकधी या क्षेत्राचा रिलेशनवर खूप परिणाम होतो. या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसासाठी त्याला समजून घेणारी त्याच्या प्रत्येक अडचणीत सांभाळून घेणारी व्यक्ती अपेक्षित असते, हे क्षेत्र फार डळमळीचा आहे. वैभव म्हणतो की, “मी करिअरच्या अशा टप्प्यात आहे, जिथे त्याला कोणत्याही दुसऱ्या गोष्टीमुळे त्याच्या कामावर आणि करिअरवर परिणाम झालेला चालणार नाही. खूप वेळा आपल्या रिलेशनचा, पर्सनल लाईफचा आपल्या करिअरवर परिणाम झालेला दिसून येतो आणि मुळात मला तेच करायचं नाहीये. मला आता आलेली एकही संधी सोडायची नाही जेवढे जास्तीत जास्त काम करता येईल. चांगलं काम करता येईल तेवढं काम करायचा आहे. मराठी असो किंवा हिंदी वेबसिरीज असो किंवा जाहिरात मला प्रत्येक क्षेत्रात एक उत्तम काम करायचा आहे आणि त्यासाठी मी पूर्ण तयार आहे.” (vaibhav tatwawaadi reveal about his ex girlfriend)

View this post on Instagram

A post shared by VAIBHAV TATWAWADI (@vaibhav.tatwawaadi)

पुढे तो म्हणतो की, “रिलेशनशिप आणि या गोष्टीमुळे खूप वेळा आपल्या या करियरवर परिणाम होत म्हणून मी त्यापासून काही काळ लांब राहिलो. माझं रिलेशन नव्हतं असं नाही पाच वर्षापूर्वी माझी ही एक गर्लफ्रेंड होती. आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो ती मुलगी इंडस्ट्रीमधील नाही ती इंडस्ट्रीच्या बाहेरची आहे. काही कारणामुळे आम्ही वेगळे झालो आणि आता मी सिंगल आहे.”

View this post on Instagram

A post shared by VAIBHAV TATWAWADI (@vaibhav.tatwawaadi)

वैभव म्हणाला की, “मी तेव्हा लग्नाच्या विचारात देखील होतो, परंतु काही कारणांमुळे काही गोष्टी जुळल्या नाहीत आणि त्यानंतर मला अजूनही योग्य असा जोडीदार मिळालेला नाही. जोडीदार योग्य हवा अंडरस्टँडिंग हवा तरच आपण लग्नाचा विचार करू शकतो. तिच्या आणि माझ्या या गोष्टींमुळे आमच्या नात्यात कोणताच कडवटपणा आला नाही तिचं लग्न झालं पण आम्ही अजुनही एकमेकांशी चांगलं बोलतो.”

View this post on Instagram

A post shared by Rohan Nisha Subhash More ???????? (@romo_clicks)

पुढे म्हणाला की, “आता मी ३२ वर्षाचा आहे. लग्न करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. जोडीदार हा योग्य आणि विचार जोडणारा असावा त्यात घाई करून काही उपयोग नाही. आणि याच विचारांचे माझे आई-वडील आहेत त्यामुळे त्यांच्याकडून त्यानेच मला सांगितलं तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तू लग्न कर. एवढी समजूतदार आई वडील असताना कसली काळजी करायची.” अशाप्रकारे वैभवने त्याच्या रिलेशनबाबत त्याचे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

 

Latest Post