Monday, July 1, 2024

‘माझ्यासाठी सोप्पं नाहीये…’ ‘पुष्पा’चा अल्लू अर्जुन हिंदी चित्रपटात काम करण्याबद्दल असं का म्हणाला?

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने दक्षिणेबरोबरच हिंदी पट्ट्यातही चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीत, आता चाहते ‘पुष्पा २’ ची वाट पाहत आहेत. पण ज्या प्रेक्षकांना हिंदी चित्रपट आवडतात, त्यांना अल्लू अर्जुनला बॉलिवूड चित्रपटातही बघायचे आहे. मात्र चाहत्यांची ही इच्छा अद्याप पूर्ण होताना दिसत नाहीये. अलीकडेच अल्लू अर्जुनने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दल खुलेपणाने सांगितले आहे.

अल्लू अर्जुनने आपल्या मुलाखतीत सांगितले की, हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणे त्याच्यासाठी एखाद्या टास्कपेक्षा कमी नसेल, कारण हे त्याच्यासाठी अजिबात सोपे नाहीये. अभिनेत्याने सांगितले की, “माझ्यासाठी हे सोपे काम नाही. पण योग्य संधी मिळाल्यावर मी नक्की काम करेन. हिंदीत अभिनय करणं सध्या माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. पण जेव्हा गरज पडेल तेव्हा मी माझ्या कम्फर्ट झोनमधून पूर्णपणे बाहेर असेन.” (pushpa starrer allu arjun talk about work in hindi film)

चाहते पाहतायेत ‘पुष्पा २’ची वाट
अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा द राइज’ २०२१च्या शेवटी पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अशा परिस्थितीत, आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. ‘पुष्पा द रुल’बद्दल सोशल मीडियावर अनेक अहवाल समोर आले आहेत, ज्यात दावा करण्यात आला आहे की हा चित्रपट २०२३ पर्यंत थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. मात्र, अद्याप निर्मात्यांनी याबाबत अधिकृत काहीही सांगितले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा