आपण नेहमीच कलाकार आणि त्यांचे आलिशान जीवन बघतो आणि त्यांचा हेवा करतो. मात्र कलाकार होणे साधी गोष्ट नाही. कलाकारांना त्यांच्या चित्रपटासाठी आणि चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी खूप मोठ्या दिव्यातून जावे लागते. आता त्यांच्या मेकअपचेच घ्या, आपल्याला वाटते की ते त्यांच्या मेकअप आर्टिस्ट समोर बसतात आणि त्यांचा थोड्या वेळात मेकअप केला जातो. मात्र असे अजिबात नाही कलाकारांना त्यांच्या भूमिकेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप करावे लागतात. कित्येकदा तर त्यांच्या मेकअप साठीच अनेक तास जातात. कलाकार त्यांना केलेला मेकअप तासंतास घालून त्यांचे काम करतात. आता सध्या सगळीकडे तुफान गाजणाऱ्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa The Rise) या सिनेमातील अर्जुनचाच मेकअप बघा. अर्जुनने त्याच्या पुष्पा राज या भूमिकेसाठी अनेक प्रकारचा मेकअप केला होता. तेव्हा तो अल्लू अर्जुनाचा पुष्पा राज झाला.
सध्या बॉक्स ऑफिसवर आणि मनोरंजनविश्वात पुष्पा सिनेमाने तुफान धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला अनेक भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात आले. या सिनेमाच्या फक्त हिंदी व्हर्जनच १०० कोटींपेक्षा अधिकच व्यवसाय केला आहे. या सिनेमाने अल्लू अर्जुनला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. सध्या सोशल मीडियावर अर्जुनाचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे, ज्यात अर्जुनाचा पुष्पा राजचा मेकअप होताना दिसत आहे.
The fire you know, the transformation you don't. ????
Watch Icon Star @alluarjun 's makeover to become the ferocious #PushpaRaj ????????#PushpaTheRise #PushpaBoxOfficeSensation @iamRashmika @aryasukku @ThisIsDSP @adityamusic @TSeries @MythriOfficial pic.twitter.com/L1sBYwLUP4
— Pushpa (@PushpaMovie) February 9, 2022
या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन त्याच्या आलिशान गाडीतून उतरतो आणि त्याच्या काळ्या रंगाच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातो. यावेळेस त्याने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, जयंत तो खूपच हँडसम दिसत होता. त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आधीपासूनच त्याचे हेयरस्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट हजर असतात. तो जाऊन खुर्चीवर बसतो आणि त्याची टीम त्याचा मेकओव्हर करायला सुरुवात करते. मेकअप हेयर स्टाईल करून तो अल्लू अर्जुनाचा पुष्पा राज बनतो. या लूकमध्ये देखील तो कमालीचा आकर्षक दिसत आहे. या मेकअपसाठी त्याला प्रोस्थेटिक सेशन देखील करावे लागले होते. अगदी आयब्रोपासून, परफेक्ट स्किन, कुरळे केस सर्वच गोष्टी बारकाईने केल्या गेल्या. या सर्व प्रक्रियेला बराच काळ लागला असला तरी तो धीराने सर्व करून घेत होता. मेकअप पूर्ण झाल्यानंतर अल्लू त्याचे बेरिंग पकडत व्हॅनमधून बाहेर पडतो. अल्लू अर्जुनाचा हा ‘पुष्पा’ सिनेमा १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. आज ५० दिवस उलटूनही सिनेमाची कमाई चालू असून, आतापर्यंत चित्रपटाने ३०० कोटींचा व्यवसाय केला आहे.
हेही वाचा :
- नकारात्मक भूमिका साकारून सुपरस्टार झालेले ‘हे’ आहेत टॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार, जाणून घ्या
- …म्हणून लता मंगेशकर अविवाहित असूनही लावत होत्या कुंकू, गानकोकीळेच्या आयुष्यातील ‘त्या’ घटनेचा झाला खुलासा
- सर्वत्र घुमणार ‘चंद्रमुखी’चा आवाज, प्रसाद ओकचा नवीन चित्रपट लवकरच होणार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज