Wednesday, June 26, 2024

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर भडकली रश्मिका मंदाना; म्हणाली, ‘अशा बातम्या येतात कुठून?’

अभिनेत्री रश्मीका मंदाना (rashmika mandana) हिचा नुकतेच काही दिवसांपूर्वी ऍनिमल हा चित्रपट रिलीझ झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटातील तिची भूमिका देखील सगळ्यांना खूप आवडली. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे मत देखील ती अनेकवेळा मांडत असते. अशातच तिच्याबाबत अफवा पसरवणाऱ्या एका पोस्टवर तिने तिचे मत व्यक्त केले आहे.

एक्स वर हि पोस्ट केली होती. तिने हि पोस्ट पहिली आणि तिने मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला. तिने त्या पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे.

यूजरला उत्तर देताना रश्मिकाने लिहिले, “कोण म्हणाले? स्क्रिप्टवर विश्वास असल्यामुळेच मी चित्रपट करते. कलाकार आणि क्रूसोबत काम करणे हा सन्मान आहे. मला या प्रकरणाचे आश्चर्य वाटते. या सर्व निराधार बातम्या कुठून सुरू होतात?

या उत्तरानंतर रश्मिकाला नेटकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. अनेकांनी स्वत:साठी उभे राहिल्याबद्दल अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. अडवल्लू मीकू जोहरलू बद्दल बोलायचे तर हा चित्रपट २०२२ मध्ये तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे ज्यामध्ये शरवानंद, रश्मिका मंदान्ना, खुशबू, उर्वशी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन किशोर तिरुमला यांनी केले होते. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

रश्मिका लवकरच पुष्पा २ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या आसपास प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. सिंघम अगेन या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

चोर निघाला दिलदार! मणिकंदन यांच्या घरातून चोरीला गेलेला राष्ट्रीय पुरस्कार, चोराने माफी मागून परतवला
रुह बाबा करणार दोन भुतांचा सामना, विद्या बालनसोबत माधुरी दीक्षितची \भूल भुलैया 3′ मध्ये वर्णी

हे देखील वाचा