चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वेशभूषेसाठी ओळखले जातात. कलाकार आणि त्यांच्या स्टाईल नेहमीच सामान्य लोकांमध्ये चर्चेचा विषय असतात आणि लोकप्रिय देखील होतात. आजचे तरुण, तरुणी अनेकदा कलाकारांच्या कपड्यांची स्टाईल कॉपी करताना दिसतात. कलाकार आणि त्यांच्या स्टाईल जरी नेहमी आकर्षक वाटत असले, तरीही कधीकधी कलाकार देखील त्यांच्या कपड्यांच्या बाबतीत चुकतात आणि लोकांच्या हसण्याचा विषय बनतात. अगदी प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोणपासून, तर रणवीर सिंगपर्यंत अनेक कलाकार त्यांच्या ड्रेसिंगवरून ट्रोल होताना आपण पाहिले आहे.
आता पुन्हा या यादीत अजून एका अभिनेत्रींच्या नावाची भर पडली आहे. ती अभिनेत्री ‘प्यार का पंचनामा’ फेम सोनाली सेहगल. सोनालीने नेहमीच तिच्या अभिनयाने आणि फिट फिगरने लोकांना घायाळ केले आहे. नुकतेच सोनालीला जिम बाहेर स्पॉट करण्यात आले. यावेळी सोनाली ज्या ड्रेसमध्ये होती, त्यावरून ती आता सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरी जात आहे.
सोनाली सेहगलसुद्धा इतर अभिनेत्रींप्रमाणे स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिमचा आधार घेत असते. आता हळूहळू सर्व अनलॉक होत असताना जिमदेखील सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक कलाकार जिमबाहेर स्पॉट केले जातात. तशीच सोनाली सेहगलदेखील नुकतीच जिमबाहेर दिसली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्स घातली होती. मात्र, तिच्या टी- शर्टची स्टाईल पाहून सोनाली आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. सोनालीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. एकाने म्हटले की, “लॉकडाऊनमध्ये फिरत असेल म्हणून तिला पोलिसांनी धुतले असेल.” एकाने लिहिले की, “जर सामान्य लोकांनी घातले असते, तर त्यांना वेडे म्हटले असते.”
अजून एकाने म्हटले आहे, “आज समजले आपल्या देशात खूपच गरीब लोकं आहेत.” अजून एका यूजरने लिहिले, “या मुलीला माझ्या घरातील फरशी पुसायचा कपडा खूपच आवडला.”
सोनाली सेहगलने २०११ साली ‘प्यार का पंचनामा’मधून पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘हायजॅक’, ‘जय मम्मी दी’ चित्रपटांमध्ये दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अदा शर्माचे विचित्र अंदाजातील फोटो व्हायरल; विचारला असा प्रश्न की, नेटकरीही झाले हैराण
-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ