Tuesday, July 9, 2024

रुपेरी पडद्यावर एलिझाबेथ राणी बनत ‘या’ अभिनेत्रींनी लुटली वाहवा, एकीची ‘गिनीज बुक’मध्ये झालीय नोंद

आपण आजपर्यत राजा-राणीच्या गोष्टी ऐकल्या असतील, पण ब्रिटनमध्ये खरी राणी होती. ती म्हणजे ‘द क्वीन एलिजाबेथ द्वितीय होय. आता एलिजाबेथ या जगात नाहीये. तिने 96 वर्षांच्या वयात शेवटचा श्वास घेतला. एलिजाबेथ 25 वर्षांच्या असताना दुसऱ्या क्रमांकाच्या ब्रिटनच्या राणी बनल्या होत्या. आता त्यांचा मोठा मुलगा ‘प्रिन्स चार्ल्स’ हा ब्रिटनचा नवीन राजा बनणार आहे. ब्रिटनच्या राणीचे आणि चित्रपटाचे खूप चांगले नाते राहिले आहे. त्यांच्या जीवनावर आधारित खूप सारे चित्रपट आणि वेबसीरिज बनवल्या गेल्या. त्यामुळे अनेक अभिनेत्रींनी त्यांची भूमिका साकारली होती. आज आपण अशा अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी एलिजाबेथ यांची भूमिका साकारली होती.

हेलेन मिरेल
हेलेन मिरेल (Helen Mirren) यांनी ‘द क्वीन’ एलिजाबेथ (Britain Queen Elizabeth) यांची भूमिका आपल्या अदाकारीने खूपच चांगल्याप्रकारे निभावली होती. त्यांच्या या भूमिकेला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे त्यांचे खूप चाहतेही बनले होते. त्यांना एलिजाबेथ भूमिकेसाठी अकादमीचे नामांकनही मिळाले होते.

जेनेट चार्ल्स
जेनेट चार्ल्स यांनी खूप साऱ्या चित्रपटांमध्ये ‘द क्वीन’ एलिझाबेथ यांचे पात्र साकारले होते. यामुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली होती. त्यांचा चेहरा थोडी थोडा एलिजाबेथ यांच्यासारखाच दिसत असल्याने त्यांना या भूमिकेसाठी लगेच स्वीकारले जात होते. यामुळे जेनेट चार्ल्स यांच्या नावाची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद आहे. त्यांनी ‘द नेकड गन: फ्रॉम द फाइल ऑफ द पुलिस स्क्वॉड’, ‘नॅशनल लॅम्पून्स युरोपियन वेकेशन’ आणि ‘ऑल यू नीड इज कॅश’ यांसाख्या चित्रपटामध्ये महाराणीच्या भूमिका बजावल्या आहेत.

सारा गॅडन
सारा गॅडन (Sarah Gadon) या अभिनेत्रीने ब्रिटन कॉमेडी-ड्रामा ‘अ रॉयल नाईट आऊट’ या कार्यक्रमामध्ये राणी एलिजाबेथ यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट साल 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये राणी एलिजाबेथ आपल्या तरुण आयुष्यामध्ये कसे जगायचे होते, यावर चित्रित केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sarah Gadon (@sarahgadon)

फ्लेअर फोय
फ्लेअर फोय या अभिनेत्रीने ‘द क्राऊन’ या वेबसीरिजमध्ये महाराणीची भूमिका केली होती. त्यांच्या या पात्राने लोकांचे मने जिंकले होती. या सीरिजमध्ये राणी एलिजाबेथ यांच्या जीवनातील दोन दशकापेक्षाही जास्त माहिती सांगितली आहे. ही वेबसीरिज 1952 साली जेव्हा राजकुमारसोबत लग्न झाल्यापासून सुरुवातीचे आयुष्यावर चित्रित आहे.

ऑलिविया कोलमन
ऑलिविया कोलमन या अभिनेत्रीने ‘द क्राऊन’ या वेबसीरिजच्या तिसऱ्या आणि चौथ्या भागापासून राणी एलीजाबेथ यांचे पात्र साकारले होते. प्रेक्षकांना तिचा अभिनय फारच आवडला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
पोपटलालला मिळेना बायको, पण शोमधील ‘हा’ कलाकार साखरपुडा होऊनही अनेक वर्षांपासून अविवाहित
‘लगता है हातों में रह गये तेरे हात’, शहनाझच्या गाण्याने चाहत्यांना आली सिद्धार्थची आठवण
रितेश देशमुखने अभिनेता करण जोहरला खेचले कोर्टात, पाहा काय आहे प्रकरण

हे देखील वाचा