Monday, July 1, 2024

अरे व्वा! ऑक्टोबरमध्ये पार पडणार ‘ही’ सौंदर्य स्पर्धा, अंतिम सोहळ्याला करिश्माही लावणार हजेरी

2021 मध्ये एक दिमाखदार आणि यशस्वीरित्या सोहळा सादर केल्यानंतर, नावाजलेली आणि आगळीवेगळी अशी सौंदर्य स्पर्धा ‘क्वीन ऑफ द वर्ल्ड (QOTW) इंडिया 2022’ ऑक्टोबरमध्ये शेड्यूल केलेल्या नवीन आवृत्तीसह परत आली आहे.

QOTW हि स्पर्धा सौंदर्य आणि त्या निगडित असणाऱ्या उद्योगाला पुन्हा एक प्रतिष्ठित असे व्यासपीठ उपलब्ध करून देते. या स्पर्धेचा मूळ उद्देश असा आहे की, आजच्या आधुनिक महिलांसाठी, तिचे वय, वैवाहिक स्थिती आणि पार्श्वभूमी विचारात न घेता सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्णपणे नेतृत्व कार्यक्रम तयार करणे आहे. QOTW इंडिया ग्लॅमर, आत्मविश्वास आणि सौंदर्य या गोष्टीना महत्व देतं, प्रत्येक स्पर्धकाला वैयक्तिक वाढीसाठी उत्कृष्ट अनुभव प्रदान करते.

या स्पर्धेचे वैविध्यपूर्ण वातावरण आणि सर्वसमावेशक संस्कृतीमुळे हि स्पर्धा इतर सगळ्या सौंदर्य स्पर्धेपेक्षा खूप वेगळी दिसून येते. यावर्षी, QOTW 18 ते 50 पेक्षा जास्त वयोगटातील महिलांना या अद्भुत जगात सामील होण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करण्याची एक सुवर्णसंधी देत आहे. यावर्षी 15 ते 20 ऑक्टोंबर दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण देशभरातील 18 ते 65 वयोगटातील 60 स्पर्धक सहभागी होणार असून, ज्यांची मुंबई, दिल्ली दक्षिण आणि पूर्व विभागामधून ऑडिशनद्वारे निवड झाली आहे. त्याचनुसार या स्पर्धकांचा प्रशिक्षण कार्यक्रम 15 ते18ऑक्टोबर या कालावधीत पुणे आणि 19 ते 20 रोजी मुंबईत होणार आहे.

यावर्षी QOTW 2022, 20 ऑक्टोंबर रोजी पार पडणाऱ्या अंतिम सोहळ्यासाठी करिश्मा कपूरसह इतर काही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि  विविध क्षेत्रामधील उदयोजक पाहुणे सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

याच विषयी सांगत असताना, क्वीन ऑफ द वर्ल्ड इंडियाच्या सीईओ आणि राष्ट्रीय संचालक उर्मीमाला बोरुआ  “हे व्यासपीठ म्हणजे स्त्रियांसाठी एक व्यासपीठ तयार करण्याचे स्वप्न सत्यात उतरवणारे आहेत. एक असे व्यासपीठ ज्याठिकाणी सगळ्या महिलांसाठी आखून ठेवलेल्या सीमांना दूर करत स्वतःची एक वेगळी ओळख बनवण्याची सुवर्णसंधी आहे. ही 2022 सालची राष्ट्रीय अंतिम फेरी असेल आणि या स्पर्धेतील विजेते मार्च 2023 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे होणाऱ्या QOTW स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.”

“यावर्षी, आमच्याकडे डॉ. मिकी मेहता सारखे मार्गदर्शक आहेत, ज्यांनी फायनल दरम्यान आमच्या स्पर्धकांना प्रशिक्षण देण्यासाठी सुष्मिता सेन, लारा दत्ता, प्रियांका चोप्रा आणि दिया मिर्झा आणि कोकोबेरीच्या अंजली आणि अलिशा राऊत आणि अभिनव माथूर यांच्यासह माजी ब्युटी क्वीनना तयार केले असून त्यांना प्रशिक्षण दिले आहे. आठवडा रॅम्प वॉक, स्पीच ते व्हॉईस मॉड्युलेशन, स्टाइलिंग आणि फोटोशूटपर्यंत सर्व गोष्टींची काळजी या मार्गदर्शकांकडून घेतली जाईल,”

ब्युटी विद ब्रेन असलेली ही स्पर्धा लकरच आपल्या भारतामध्ये सुरु झाली आहे. हा कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडणार असून यामध्ये आपल्या पार्पारिका वेश परिधान करण्याची संधी आहे. त्यामुळे ऑडिशनमध्ये जेवढ्या महिला निवडल्या आहेत त्यांना ही मोलाची संधी आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही वाचा-
हे वेड जगावेगळे! कियारला भेटण्यासाठी चाहत्यांनी केली हद्द पार
आतुरता संपली! ‘मनिके’ गाण्याचं हिंदी व्हर्जन रिलीज, सिद्धार्थ अन् नाेरावर काैतुकाचा वर्षा

हे देखील वाचा