Thursday, March 30, 2023

अभिमानास्पद! आर माधवनच्या मुलाने केली सुवर्ण कामगिरी; ट्वीट शेअर करत अभिनेता म्हणाला,’खूप कृतज्ञ…’

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची मुलं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात त्याशिवाय जवळपास सगळेच स्टारकिड्स आपल्य आई-वडीलांच्या पाउलावर पाउल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण करत असतात. मात्र, किंचितच काही स्टारकिड्स असतील जे कलाकारांची मुलं असूनही इंडस्ट्रीपासून लांब अहेत. त्यापैकी लोकप्रिय अभिनेता आर माधवन याच्या मुलाने अभिनय नाही तर तर स्विमिंगमध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवलं आहे.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता आर माधवन (R. Madhavan) याने नुकतंच आपल्या अधिकृत ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे अभिनेत्याने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. माधवनचा मुलाग वेदांत माधवन (Vedaant Madhavan) याने ‘खेलो इंडिया यूथ गेम्स 2023’ या स्पर्धेत 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं जिंकली आहेत. ज्यामुळे अभिनत्याचा आनंद गनात मावेनासा झाला आहे. वेदांतला शुभेच्छा देत माधवने ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

माधवनने ट्वीट शेअर करत वेदांतचं कौतुक करत लिहिले की, वेदांतने 100 मीटर, 200 मीटर आणि 1500 मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे, तर 400 आणि 800 मीटर स्विमिंगमध्ये त्याला 2 रौप्य पदक मिळाली आहेत. माधवनने ही पोस्ट शेअर करत वेदांतसह या स्पर्धेत भाग घेतलेल्या आणि जिंकलेल्या इतर मुलांचेही अभिनंदन केले आहे. अभिनेत्याच्या पोस्टनंतर अनेक चाहते कलाकार माधवनचं अभिनंदन करत आहेत.

पूर्वी देखिल खेलो ‘इंडिया यूथ गेम्स’ मध्ये वेदांत कर्णधार म्हणून महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व केलं होतं. या स्पर्धेतही वेदांतमुळे महाराष्ट्रा राज्यच्या संघाने ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. लहानपणापासूनच माधवनच्या मुलाल अभिनयात रस नव्हता. आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव मोठं करावा यासाठी माधवन आपल्या मुलाल नेहमी पाठिंबा देत असतो.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आमिर खान दिसतोय काठीच्या साहाय्याने चालताना, त्याची अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का
‘आणि विजेता शिव ठाकरे…’, ग्रँड फिनालेपूर्वी व्हायरल झाला बिग बॉसचा हा व्हिडिओ

हे देखील वाचा