Friday, March 29, 2024

‘आणि विजेता शिव ठाकरे…’, ग्रँड फिनालेपूर्वी व्हायरल झाला बिग बॉसचा हा व्हिडिओ

अखेर ‘बिग बॉस 16‘मध्ये वेळ आली आहे, जेव्हा या सीझनमधील विजेत्याचे नाव घोषित केले जाईल. शिव ठाकरे, शालीन भानोत, एमसी स्टेन, प्रियांका चौधरी आणि अर्चना गौतम ट्रॉफीसाठी लढत आहेत. मात्र, या सीजनमध्ये शिव, प्रियांका आणि स्टेन यांच्यावर विजयाचा दावा जास्त असल्याचे मानले जात आहे. मात्र, कोण विजेता होणार आणि कोण फर्स्ट की सेकंड रनर अप ठरणार हे आतापासून काही तासांतच समोर येणार आहे. अशात आता शिव ठाकरेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून त्यांचे चाहते आनंदाने उड्या मारतील.

शिव ठाकरे (shiv thakare) याच्या चाहत्यांनी त्याला यंदाच्या सीजनचा विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यांच्याशी अधिकाधिक लोक जोडले जावेत, यासाठी रस्त्यावर रॅली काढण्यात येत आहे. सोशल मीडियावरही ‘विजय भव शिव ठाकरे’ ट्रेंड चालू आहे.

ज्या प्रकारे शिव ठाकरे यांची लोकप्रियता आणि चाहत्यांचे त्यांच्यावरील प्रेम वाढत आहे, ते पाहता ताे या वर्षीच्या सीजनचा विजय ठरु शकताे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दरम्यान, त्याच्याशी संबंधित बिग बॉसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील आहे, जाे शिव ठाकरेंनी जिंकला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महेश मांजरेकर एका बाजूला शिवाचा हात धरून उभे आहेत, तर दुसरीकडे नेहा शितोळे आहे. यावेळी महेश मांजरेकर यांनी शिव ठाकरे विजयी झाल्याची घोषणा केली. हे ऐकून शिव स्तब्ध झाला. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट सुरू होतो.

शिव ठाकरेला केवळ चाहत्यांचीच मते नाहीत, तर सेलिब्रिटींनीही त्याला विजयी करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. रणविजय सिंगपासून प्रिन्स नरुलापर्यंत अनेक नामवंत चेहऱ्यांनी शिवाला पाठिंबा दिला आहे. एमटीव्ही इंडियावरील टीव्ही होस्ट निखिल चिनपा यांनीही शिव ठाकरेला त्याच्या विजयासाठी पाठिंबा दिला आहे.(bigg boss 16 contestant shiv thakare old video of bigg boss marathi viral mahesh manjrekar declares him winner )

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रत्येक रेट्रो गोष्ट तिच्यात सुंदर आहे…! धनश्री काटगावकरचा नवीन लूक

विवेक अग्निहोत्रींनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांवर साधला निशाणा; म्हणाले, ‘मोदींमुळे मला…’

हे देखील वाचा