Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड Rocketry | चालू शकली नाही आर माधवनच्या ‘रॉकेट्री’ची जादू, ओपनिंग डेला केली केवळ ‘एवढी’ कमाई

Rocketry | चालू शकली नाही आर माधवनच्या ‘रॉकेट्री’ची जादू, ओपनिंग डेला केली केवळ ‘एवढी’ कमाई

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) मोस्ट अवेटेड चित्रपट ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट्स’ शुक्रवारी (१ जून) प्रदर्शित झाला आहे. ज्या अंतर्गत ‘रॉकेट्री’च्या पहिल्या दिवशी कमाईचे आकडे (rocketry 1st Day Collection) देखील समोर आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ‘रॉकेट्री’ ओपनिंग डेवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे आर माधवनच्या या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन खूपच कमी झाले आहे. 

ओपनिंग डेला ‘रॉकेट्री’ची कमाई
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन आर माधवन याने केले आहे. ‘रॉकेट्री’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरलेला दिसत नाही. त्यामुळे आर माधवनच्या या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन खूपच कमी झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट्स’ने रिलीझच्या दिवशी फक्त ७५ लाखांची कमाई केली आहे. जे आर माधवनच्या स्टाररनुसार खूपच कमी आहे. मात्र, व्यापार विश्लेषकांनी या चित्रपटातील आर माधवनच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले आहे. (r madhavan starrer rocketry 1st day box office collection)

कान्स महोत्सवात मिळाला होता चांगला प्रतिसाद
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२मध्ये आर माधवनच्या ‘रॉकेट्री’चा प्रीमियर ठेवण्यात आला होता. हे पाहिल्यानंतर, ज्युरींसह सर्व लोकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले. पण सध्या मोठ्या पडद्यावर ‘रॉकेट्री’ विशेष प्रभाव दाखवू शकला नाही. मात्र येत्या काही दिवसांत आर माधवनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा