Saturday, June 29, 2024

‘रहना है तेरे दिल में’चा येतोय सीक्वल; माधवन म्हणतोय, सिनेमात ‘या’ दोघांनाच घ्या!

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या बातमीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आलिया भट्टने 27 जून रोजी पोस्ट शेअर करून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून ती चर्चेत आली आहे. सध्या आलियाच्या प्रेग्नेंसीची  सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. आलियाचे चाहत्यांसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी अभिनंदन केले. आलिया लवकरच पती रणबीरसोबत ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. रणबीरसोबत ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र आता समोर आलेली बातमी कळल्यानंतर चाहत्यांचा आनंद द्विगुणित होईल. आलिया लवकरच ब्रह्मास्त्र व्यतिरिक्त आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. याबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा (R. madhvan) डेब्यू चित्रपट ‘रेहना है तेरे दिल में’ ज्यामध्ये तो दिया मिर्झासोबत दिसला होता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाबाबत बातम्या येत आहेत की लवकरच त्याचा सीक्वल बनणार आहे. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आर माधवनने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत ‘रेहना है तेरे दिल में’ चित्रपटाचा सिक्वेल करणे मूर्खपणाचे ठरेल, असे म्हटले आहे. जर मी निर्माता असतो तर मी हे केले नसते. या सगळ्यानंतर त्याने सिक्वेलच्या निर्मात्यांना शुभेच्छाही दिल्या. यानंतर तो पुढे म्हणाला की जर सिक्वेल बनवला जात असेल तर या सिक्वलसाठी आलिया आणि कार्तिक आर्यनची जोडी सर्वोत्कृष्ट असेल. याशिवाय आर माधवनने चित्रपटासंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या. मात्र आलिया भट्टचे नाव समोर आल्याने चाहते खूपच खूश दिसत आहेत.

दरम्यान आर माधवन आणि दिजा मिर्झाचा ‘रेहना है तेरे दिल में’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. चित्रपटातील प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. आजही या चित्रपटाची गाणी सुपरहीट आहेत. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच जोरदार उत्सुकता आहे. चित्रपटात आलिया आणि कार्तिक आर्यनची जोडी पाहायला मिळणार असेल तर चाहते आणखीनच खुश होणार आहेत. आता ही बातमी खरी ठरणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा