Tuesday, June 24, 2025
Home साऊथ सिनेमा फ्लॅाप ठरला प्रभासचा ‘राधेश्याम’, पाच दिवसांत २० कोटीही कमावू शकला नाही चित्रपट

फ्लॅाप ठरला प्रभासचा ‘राधेश्याम’, पाच दिवसांत २० कोटीही कमावू शकला नाही चित्रपट

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पुजा हेगडे (Pooja Hegde) यांचा ‘राधेश्याम’ हा चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’सोबत प्रदर्शित झाला असून, बॅाक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसात जगभरात १६५.१८ कोटी रुपयांची कमाई केली. पण या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांना थिएटरमध्ये आमंत्रित करता आले नाही. सुरुवातीच्या दिवसांमध्ये ‘राधेश्याम’ने आंध्र प्रदेश आणि तेलंगनामध्ये बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मात्र जसेजसे दिवस जात आहेत, तसतशी चित्रपटाची कमाई कमी होत चालली आहे.

‘राधेश्याम’ ११ मार्च रोजी तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषेत प्रदर्शित झाला होता. मात्र चित्रपट अपेक्षेप्रमाने कमाई करू शकला नाही. चित्रपटाने तेलगु राज्यात ३७.९१ करोड रुपयांचे शेअर्स गोळा करून आपले खाते उघडले होते. नंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी चित्रपटाने अनुक्रमे १९.२८ कोटी, १६.५ कोटी, ३.५८ कोटी इतकी कमाई केली. उत्तर भारत, कर्नाटक आणि तमिलनाडूसह इतर राज्यांमध्येही चित्रपटाचे कलेक्शन अप्रतिम राहिले आहे.

म्हणजेच भारतात प्रभासच्या चित्रपटाने १०० कोटींचा आकडाही पुर्ण केलेला नाही. ‘राधेश्याम’ने बॅाक्स ऑफिसवर एकूण ९७.७ कोटीची कमाई केली होती. राज्यातील चित्रपटाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, ‘राधेश्याम’च्या पाच दिवसांत तेलगु व्हर्जनने १.११ कोटी रुपये आणि मल्याळम व्हर्जनने केवळ ०.०७ कोटी रुपये कमावले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

हे देखील वाचा