‘राधेश्याम’ चित्रपटाकडून पूर्ण झाल्या नाहीत प्रभासच्या चाहत्याच्या अपेक्षा, चाहत्याने उचलले आत्महत्येचे पाऊल

0
603
Prabhas
Photo Courtesy: Instagram/actorprabhas

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. कोणत्याही कलाकाराचा चित्रपट प्रदर्शित होणार असला, तर त्यांचे चाहते त्यासाठी अगदी वेडे होतात. कलाकारांचा प्रत्येकाचा एक मोठा चाहता वर्ग आहे. हे सगळे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांसाठी अगदी हद्द पार करतात. कधी कधी हेच चाहत्यांच्या जीवावर बेतते. तेलुगू सुपरस्टार प्रभासच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.‌परंतु जेव्हा तोच चित्रपट चाहत्यांना आवडत नाही तेव्हा मात्र ते निराश होऊन जातात.

नुकतेच प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामुळे त्याचा एक चाहता खूपच नाराज झाला आहे. तसेच त्याने आता आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तो त्याचा आवडता कलाकार प्रभासला अनेकांना नकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या सहन झाल्या नाही. या सगळ्यांनी तो खूप नाराज झाला. त्यानंतर त्याने घरी येऊन फासी घेतली.

माध्यमातील वृत्तानुसार, आंध्रप्रदेशमधील कुरनुल येथील टिळक मार्गमध्ये 24 वर्षीय मुथाला रवी तेजा नावाच्या एका व्यक्तीने चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया आल्याने आत्महत्या केली. त्याने हा चित्रपट पहिल्याच दिवशी पहिला होता. त्यावेळी त्याने घरच्यांना सांगितले की, चित्रपट एवढा काही खास नाहीये.

‘राधेश्याम’ या चित्रपटाची मागील अनेक दिवसापासून चर्चा आहे. चित्रपट पाहण्यासाठी सगळेच उतावीळ झाले होते. परंतु काहींना हा चित्रपट काही खास आवडला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी साऊथमध्ये ठीकठाक गल्ला केला. परंतु हिंदीमध्ये हा चित्रपट काही खास चालला नाही. चित्रपटाच्या हिंदी व्हाराजन ने पहिल्या दिवशी 4.5 कोटीचा व्यवसाय केला. परंतु पुढील चार दिवसात या चित्रपटाने केवळ 14 कोटीचा गल्ला केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :
फ्लॉप चित्रपट देऊनही अभिनेता प्रभासने वाढवले मानधन, आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
प्रभासने ‘तो’ निर्णय घेतला असता, तर ‘बाहुबली’ने केली नसती 35 तासात 100 कोटींची कमाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here