बेधडक, लोकांना विचार करायला भाग पाडणारे आणि समाजात परिवर्तन घडवणारे, अशा चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे होय. तिच्या डॅशिंग स्वभावामुळे चित्रपटातील कठीणातील कठीण भूमिका उत्तमपणे साकारते. राधिका मुळातच धीट स्वभावाची आहे. त्यामुळे भले भले नाकारतील अशा ‘पॅड मॅन’मध्ये तिने उत्कृष्ट अभिनय केला. लोक काय बोलतील याकडे लक्ष देण्यापेक्षा, लोकांना आपल्या अभिनयातून आपण काहीतरी शिकवले पाहिजे असे तिला वाटते. राधिकाचे बरेचसे हिट चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झालेले आहेत. त्यामुळे सर्व चाहते तिला ओटीटी क्वीन म्हणून ओळखतात. राधिका मंगळवार (७ सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करते. जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.
राधिका आपटेचा जन्म तामिळनाडूच्या वेल्लोर येथे ७ सप्टेंबर १९८५ रोजी झाला. त्यांनतर तिचे वडील डॉ. चारुदत्त आपटे न्यूरोसर्जन आणि सह्याद्री हॉस्पिटल, पुणेचे अध्यक्ष झाले. तिने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि गणिताची पदवी घेतली. पुण्यात वाढताना तिने कथ्थक प्रतिपादक रोहिणी भाटे यांच्याकडे आठ वर्षे कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. या काळात ती पुण्यात नाट्यक्षेत्रात सामील झाली आणि चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची तिची गोडी वाढू लागली. (Radhika Apte Birthday special know about Radhika behind love story and wedding secret)
साल २००५मध्ये तिने ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००९ मध्ये तिने लगातार तीन चित्रपट केले. यातील ‘घो मला असला हवा’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटामध्ये तिने सावी नावाचे पात्र साकारले होते. तिच्या या चित्रपटातील अभिनयाने खेड्यातील आगाऊ मुलींचा एक वेगळा चेहरा समोर आला. त्यानंतर तिच्या चित्रपटांमधून तसेच वेगवेगळ्या शोमधून ती कायमच चाहत्यांच्या चर्चेत राहिली.
लंडनलामध्ये मिळालं प्रेम
राधिकाच्या अभिनयाने जसे सर्व परिचित आहे, तसे तिच्या लग्नाविषयी कोणालाही फरशी माहिती नाही. राधिका चित्रपटांमध्ये यश मिळवत असताना लंडनला गेली होती. तिथे तिला कंटेम्परेरी हा डान्स शिकायचा होता. त्यावेळी तिची भेट तेथील फेमस म्यूजिशियन बेनेडिक्ट टेलर बरोबर झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली. पुढे त्यांनी आपल्या या नात्याला दुसरे नाव द्यायचे ठरवले. बरीच वर्ष ते दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते.
दारिद्र्य दाखवत केले लग्न
अभिनेत्रीने बेनेडिक्ट टेलरसोबत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिने एक फाटकी आणि खूप जुनी साडी नेसली होती. त्यावेळी अनेकांना तिच्या अशा वागण्याचा प्रश्न पडला होता. तिच्या चाहत्यांना वाटत होतं की, तिच्याकडे पैसे नसतील साडी घेण्यासाठी. परंतु यावर अभिनेत्रीने स्वतः उत्तर दिले होते. ती म्हणाली होती की, “मला जास्त खर्च करायला आवडत नाही. माझ्या लग्नात मी जी साडी नेसली होती ती माझ्या आजीची होती. माझी आजी माझे खूप लाड करायची. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात महत्वाच्या दिवशी मला तिचीच साडी नेसावी वाटली.”
अजब कारणासाठी केलं लग्न
राधिकाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाविषयी एक अजब खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, “मला लग्नच्या परंपरेवर फारसा विश्वास नाही. परंतु मला बेनेडिक्ट टेलरसोबत राहायचे होते. त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता. परंतु तिकडे जाण्यासाठी माझ्याकडे विजा नव्हता. तो मिळवण्यासाठी मी लग्न केलं.”
राधिका कोरोना काळामध्ये देखील तिच्या पतीसोबतच होती. अभिनयात जसे अनोखे आणि निर्भीडपणे ती भूमिका निभावते तशीच ती तिच्या खऱ्या आयुष्यात देखील तितकीच अनोखी आणि निर्भीड आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा