अभिनेत्री राधिका आपटे हिने आपल्या दमदार अभिनेयाने बॉलिवूडच नाही तर साऊथ आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये देखिल छाप सोडली आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. राधिका जेवढी आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते तेवढीच आपल्या बिंदास्त वक्तव्यासाठी देखिल ओळखली जाते. तिने अनेकदा बिंदास्तपणे आपले मत व्यक्त केले आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्री आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे
अभिनेत्री राधिका आपटे(Radhiki Apte) हिने आपल्या कामगिरीसोबतच बिंदास्त गर्ल म्हणून आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील बोटावर मोजता येतील एवढ्या अभिनेत्रीच बिंदास्तपणे आपले मते व्यक्त करत असतात आणि या यादीमध्ये राधिका आपटेचं देखिल नाव आहे. अभिनेत्रीने आजपर्यत अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. मात्र, बॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमध्ये नाव मिळवने खूप कठीण असते. राधिकालाही इंडस्ट्रीचा प्रवास सोपा न्हवता. तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “मला अनेकदा मला चित्रपटातून भूमिकांसाठी रिजेक्ट करण्यात आले आहे.”
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, “बॉलिवूडमध्ये वयाला खूप महत्व आहे. तुमच्या अभिनयापेक्षा जास्त तुमच्या तरुन दिसण्याला महत्व दिले जाते. त्यामुळे अनेक अभिनेत्री तरुन दिसण्यासाठी सतत आपल्या शरिराच्या विविध भागांची सर्जरी करत असतात. मला देखिल अनेकद सर्जरी करण्याचा सल्ला दिला दिला होता, पण मी सर्जरी केली नाही.तरुन दिसण्यासठी मी आजपर्यत कोणत्याच प्रकारची सर्जरी केली नाही, पण बॉलिवूडमध्ये वयाला खूप किंमत आहे. अनेक चित्रपटांसाठी तरुन अभिनेत्रीच हव्या असतात हे सत्य नाकारता येत नाही. फक्त भारतीय सिनेसृष्टीतच नाही तर जगभरात अनेक महिला या गोष्टी विरोधात लढत आहे.”
View this post on Instagram
राधिकाने ‘मोनिका’, ‘ओ माय डार्लिंग’ सारख्या चित्रपटामध्ये तिने अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि हुमा कुरेशी (Huma qureshi) यासोबत मुख्य भूमिकेत काम केले आहे. यापूर्वी तिने विक्रमवेधा चित्रपटामध्ये सैफ अली खान आणि ऋतिक रोशन सारख्या अभिनेत्यासोबत स्क्रीन सेअक केली होती. मात्र, या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर अयश आलं. राधिकाने केवळ चित्रपटातच नाही तर ओटीटीवरही अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अबब! ‘या’ एका सवयीमुळे चक्क सेटवर म्हशी बांधणारा अवलिया, ‘शोले’ च्या गब्बरचा असा आहे सिनेप्रवास
मैत्री असावी तर अशी! अमजद खान आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीचा ‘हा’ किस्सा तुम्हाला करेल भावुक