Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड विवाहीत आहे राधिका आपटे! मग कोण आहे तिचा पती आणि अभिनेत्रीकडे का नाहीये लग्नाचा एकही फोटो?

विवाहीत आहे राधिका आपटे! मग कोण आहे तिचा पती आणि अभिनेत्रीकडे का नाहीये लग्नाचा एकही फोटो?

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) ही तिच्या चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारी राधिका सध्या Zee5 वर प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘फॉरेंसिक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. राधिका तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही किंवा सोशल मीडियावर फोटो शेअर करत नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान राधिकाने तिच्या लग्नाबद्दल सांगितले आणि सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे कोणतेही फोटो का नाहीत हेही सांगितले.

खरं तर, राधिका आपटेने २०१२ मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले होते. दोघेही आपल्या लग्नाला लाइमलाइटपासून दूर ठेवतात. राधिकाने मुलाखतीदरम्यान सांगितले की, ती २०११ मध्ये बेनेडिक्ट टेलरला भेटली, जेव्हा ती डान्स शिकण्यासाठी लंडनला गेली होती. दोघेही काही काळानंतर एकत्र राहू लागले आणि २०१२ मध्ये एका छोट्याशा समारंभात लग्न झाले. यानंतर दोघांनी २०१३ मध्ये अधिकृत लग्न केले. (radhika apte married to benedict taylor in 2012)

लग्नातील फोटो शेअर न केल्याबद्दल बोलताना राधिका म्हणाली, “माझे आणि बेनेडिक्टचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले, तेव्हा आम्ही फोटो काढायला विसरलो होतो. आमचे एक DIY (डू इट युवरसेल्फ) लग्न होते, ज्यामध्ये आम्ही आमचे जेवण स्वतः शिजवले आणि आमच्या मित्रांच्या उपस्थितीत उत्तर इंग्लंडमध्ये लग्न केले. आमचे अर्धे मित्र फोटोग्राफर होते, पण लग्नाचे फोटो कोणीही क्लिक केले नाहीत. आम्ही सर्व नशेत होतो आणि त्यामुळे माझ्याकडे लग्नाचे कोणतेही फोटो नाहीत, ही एक प्रकारे चांगली गोष्ट आहे.”

राधिका पुढे म्हणाली की, जेव्हा संस्मरणीय प्रसंगी फोटो क्लिक करण्याचा विचार येतो तेव्हा बेनेडिक्ट सर्वात वाईट आहे. राधिका म्हणाली, “माझा नवरा वाईट आहे, कोणतेही फोटो क्लिक करत नाही. पण, आता जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा तो नक्कीच काहीतरी क्लिक करण्याचा प्रयत्न करतो.”

राधिका लवकरच ‘फोरेन्सिक्स’ नंतर ‘विक्रम वेध’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा