Wednesday, April 1, 2026
Home बॉलीवूड विग सेटिंगपासून हेअरलाइनपर्यंत बारकाईने साकारला होता ‘धुरंधर’मधील ‘अक्षय खन्ना’चा लुक, आता व्हिडिओ होतोय व्हायरल

विग सेटिंगपासून हेअरलाइनपर्यंत बारकाईने साकारला होता ‘धुरंधर’मधील ‘अक्षय खन्ना’चा लुक, आता व्हिडिओ होतोय व्हायरल

चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपट गाजतात कारण त्यातील कथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळे, तर कोणत्याही मालिकेत चित्रपटात मुख्य पात्र हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच ती मत कथा चित्रपट ओळखले जाते. मात्र चित्रपटातील विलन कॅरेक्टर ही तितकेच महत्त्वाच्या असते आणि असे अनेकदा घडते की विलन करणारे कॅरेक्टर करूनही त्या कलाकाराला प्रेक्षक लक्षात ठेवतात आणि त्याची प्रशंसा करतात. असाच एक चित्रपट म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर धुरंधर आहे. तर या चित्रपटाला अक्षय खन्नाला एक नवीन ओळख दिली. त्याच्या लूक आणि अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. आपल्या दमदार अभिनयाने खळबळ माजवणारा अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे.

आदित्य धरच्या (Dhar)ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर’ मधील अक्षय खन्नाच्या हेअरस्टाईलच्या बारकाईचे कौतुक होत असल्याने त्याचा लूक पुन्हा एकदा चर्चेत आहे. अक्षय खन्ना केवळ त्याच्या अभिनयामुळेच नव्हे, तर चित्रपटातील त्याच्या लूकमुळेही लक्ष वेधून घेत आहे. त्याने आपल्या पात्राला जिवंत करण्यासाठी आणि आपले रूप अधिक आकर्षक बनवण्यासाठी खास डिझाइन केलेल्या विगचा वापर केला. अलीकडेच, सोशल मीडियावर एक पडद्यामागील व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये त्याचे बारकाव्यांकडे असलेले बारकाईने लक्ष आणि कामाप्रती असलेली निष्ठा दिसून येते.

या व्हिडिओमध्ये, अक्षय आपल्या टीमला विगच्या फिटिंग आणि स्टायलिंगबद्दल अचूक सूचना देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अक्षय म्हणताना ऐकू येतो, ही एक बाजू? आता हा कट बघा, तो सरळ माझ्या बाजूला जातोय. ठीक आहे? यामुळे ते स्क्रीनवर खूप नैसर्गिक दिसेल. तो टीमला समजावून सांगतो की दोन्ही बाजूंना आणि वरचे केस कसे मोकळे सोडले पाहिजेत, जेणेकरून ते नकली दिसणार नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘रामायण’च्या रिलीजपूर्वी रणबीरला चाहत्याकडून मिळाली खास भेट, भेट वस्तुवर प्रभू रामांची आहे झलक

हे देखील वाचा