Monday, March 4, 2024

महाराष्ट्राच्या विधान भवनात झाली ‘मैं अटल हूं’ची खास स्क्रिनिंग, अध्यक्षांकडून चित्रपटाचे कौतुक

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींचा बायोपिक ‘मैं अटल हूं’ (main atal hoon)काल शुक्रवारी 19 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राच्या विधान भवनात शुक्रवारी संध्याकाळीच या चित्रपटाची खास स्क्रीनिंगही करण्यात आली. या चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठीने माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींची मुख्य भुमिका साकारली आहे.महाराष्ट्र विधानसभेत झलेल्या या खास स्क्रिनिंगला चित्रपटाचे निर्माते विनोद भानुशाली आणि दिग्दर्शक रवी जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यावर अनेकांनी चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटुन शुभेच्छा देखील दिल्या. हा चित्रपट आवडला असल्याचेही अनेकांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या विधान भवनात ‘मैं अटल हूं’च्या खास स्क्रिनिंगचे आयोजन महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(rahul narvekar) केलं होतं. यावेळी महाराष्ट्र सरकारचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ(chhagan bhujbal) आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी खास हजेरी लावली. राहुल नार्वेकर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरुन मुंबईमधील कोलाबा विधानसभेचे विधायक आहेत.राहुल नार्वेकरांनी ‘मैं अटल हूं’च्या खास स्क्रीनिंगचं आयोजन हे विधानसभेच्या कर्मचाऱ्यांसाठी केलं होतं

महाराष्ट्राच्या विधान भवनात ‘मैं अटल हूं’च्या खास स्क्रिनिंगचे आयोजन शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता केले होते. या मुहूर्तावर चित्रपटाचे निर्माता विनोद भानुशाली आणि दिग्दर्शक रवी जाधवदेखील उपस्थित होते. अभिनेता पंकज त्रिपाठीही(pankaj tripathi) उपस्थित राहताल अशी आशा केली जात होती. परंतु काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये खुप जोश दिसुन यतोय.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे सर्वांचे लाडके नेते होते. त्यांच्या राजकीय विचारसरणीबद्दलचे त्यांचे अपार समर्पण, त्यांची संवेदनशीलता आणि गतिमान व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी केवळ त्यांच्या चाहत्यांनाच नाही तर त्यांच्या विरोधकांनाही त्यांचे प्रशंसक बनवले. महाराष्ट्रातील अनेक नेते त्यांच्या या आवडत्या नेत्याच्या चित्रपटाची वेगळी स्क्रीनिंग करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे(BJP) नेते निरंजन वसंत डावखरे यांनी शुक्रवारी दुपारी ठाण्यातील मुवीमॅक्स थिएटरमध्ये लोकांसाठी मोफत स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. देशभरातून या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रश्मीका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
सानिया मिर्जासोबत घटस्फोटाच्या चर्चांनंतर शोएब मलिक अडकला पुन्हा एकदा लग्नबंधनात;पाहा कोण आहे पत्नी

 

हे देखील वाचा