Monday, February 26, 2024

सानिया मिर्जासोबत घटस्फोटाच्या चर्चांनंतर शोएब मलिक अडकला पुन्हा एकदा लग्नबंधनात;पाहा कोण आहे पत्नी

माजी टेनिसपटू सानिया मिर्जा(Sania Mirza) आणि तिचा पती क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या नात्यात दरी पडल्याच्या बातम्या खुप दिवसांपासून चर्चेत आहेत. मध्यंतरी अशीही बातमी आली होती की,दोघं वेगळे झालेत. आता मात्र ते खरंच वेगळे झाल्याचं समोर येत आहे. इतकंच नव्हे तर सानिया मिर्जाचा पती शोएब मलिकने आता तिसरं लग्नही केलंय. काही वेळापुर्वीच त्याने त्याच्या सोशल मिडियावर या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

कोण आहे शोएब मलिकची पत्नी
शोएब मलिकने आज इंस्टाग्रामवर त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. शोएब मलिकची तिसरी पत्नी ही पाकिस्तानी ऍक्ट्रेस आहे. सना जोवेद असं तिचं नाव असून, तिने पाकिस्तानी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 20जानेवारीला सना आणि शोएबने त्यांच्या निकाहचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर टाकून त्यांच्या लग्नाची घोषणा केली आहे. फोटोंमध्ये शोएब आणि सना एकमेकांच्या प्रेमात मग्न झाल्याचे दृष्य दिसत आहे. या फोटोंसोबतंच शोएबने खाली लिहिले आहे, “अल्हम्दुलिल्लाह। और हमने आपको पेयर्स में क्रिएट कर दिया।”. शोएब मलिकने वेडींग फोटोंमध्ये व्हाइटीश क्रिम रंगाची शेरवानी घातली आहे. तर त्याची नवी पत्नी सना जावेद पेस्टल ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिने हेवी ज्वेलरीने तिचा लुक कंप्लिट केला आहे.त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये दोघंही साइड हग करून पोज देत आहेत तर दुसऱ्या फोटोत शोएब त्याच्या नुकत्याच झालेल्या पत्नीच्या प्रेमात बुडालेला दिसत आहे.

सना जानेदने बदललं तिचं आडनाव
सना जावेदने लग्नानंतर अगदी काही वेळातंच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचं नाव बदललं आहे. तिने तिच्या नावापुढे शोएबचं आडनाव जोडलं आहे. आता तिने इंस्टाग्राम हँडलवर तिचं नाव सना जावेद-मलिक असं असं केलं आहे.

सानिया मिर्जाने दिली होती घटस्फोटाची हिंट
सानिया मिर्जा आणि शोएब मलिकने 2010मध्ये लग्न केलं होतं. दोगांना एक मुलगाही आहे. मागच्या एका वर्षापासून शोएब आणि सानियाच्या नात्यात दूरावे आल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मध्यंतरी सानियाने त्यांच्या घटस्फोटाची चाहत्यांना थोडीशी हिंट दिली होती. तिने एक क्वोट पोस्ट कोला होता. त्यात लिहिले होते की,”लग्न कठीण आहे, घटस्फोट कठीण आहे. ”

कोण आहे सना जावेद ?
सना जावेद(sana javed) पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत ‘कहानी’, ‘ऐ मुश्त-ए-खाक’, ‘रोमियो वेड्स हीर’, ‘रुसवाई’, ‘डंक’ आणि ‘डर खुदा से’ सारख्या सीरियल्स मध्ये काम केलं आहे. सध्या सना टीवी सीरियल ‘सुकून’मध्ये एना ची भूमिका करत आहे. सना जावेदचं देखील हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने उमर जसवालसोबत लग्न केलं होतं.

हे देखील वाचा