Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सिंदूर नाही लावलं?’ चाहत्याच्या प्रश्नावर सर्वांसमोरच भांडू लागले राहुल- दिशा, मग नंतर…

जुलै महिन्याची सुरुवातीपासूनच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये फक्त एकच चर्चा रंगत होती, ती म्हणजे राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचे लग्न. तसे पाहिले तर या दोघांनी त्यांचे नाते जगजाहीर केल्यानंतरच लग्नाच्या चर्चा व्हायला सुरुवात झाली होती. मात्र जेव्हा त्यांनी लग्नाची तारीख जाहीर केली त्यानंतर तर सोशल मीडिया, टीव्ही, न्यूजपेपर सगळीकडे फक्त आणि फक्त दिशा आणि राहुलच दिसत होते. त्यांच्या लग्नाचे सर्व विधी, तयारी पासून सर्वच गोष्टी मीडियामध्ये येत होत्या. अतिशय जोरात, थाटामाटात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून या दोघांनी १६ जुलैला लगीन गाठ बांधली. त्यानंतरही त्यांचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Photo Courtesy: Instagram/rahulvaidyarkv

नुकतेच या दोघांनी इंस्टावर लाईव्ह येत त्यांच्या फॅन्सशी भरभरून गप्पा मारल्या. या लाईव्ह सेशन दरम्यान या दोघांमध्ये गोड भांडण देखील पाहायला मिळाले. राहुल आणि दिशाने इंस्टावर लाईव्ह येत फॅन्सच्या सर्व प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिली. या दरम्यान एका फॅनने दिशाला विचारले, ‘की तू भांगेत कुंकू का नाही लावले?’ असा हा अनपेक्षित प्रश्न आल्यानंतर दिशाने हा प्रश्न राहुलवर फिरवला. (rahul vaidya and disha parmar debating over maang ka sindoor)

फॅनने हा प्रश्न विचारल्यानंतर राहुलने देखील दिशाला विचारले की तिने कुंकू का नाही लावले. दिशाने लगेच हा प्रश्न राहुलवर उलटवला आणि म्हणाली, “राहुलनेच नाही लावून दिले.” दिशा म्हणाली, “बिग बॉसमध्ये राहुलने म्हटले होते की, तो रोज सकाळी माझ्या भांगेत कुंकू लावेल.” त्यावर राहुल म्हणाला, “कोणी म्हटले होते हे?” यावर दिशा त्याची मजा घेत म्हणाली, “मीच म्हटले होते. मी गेले होते ना बिग बॉसमध्ये.”

पुढे राहुलने सर्व सांभाळत म्हटले, “बेबी मी कामात बिझी असतो ना, तर तू स्वतः लावून घेत जा.” यानंतर त्याने ओम शांती ओम चित्रपटातील ‘एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू’ हा डायलॉग देखील म्हटला. मात्र हा प्रश्न समोर आल्यानंतर वातावरण विचित्र तयार झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा