ठरलं तर! राहुल वैद्य अन् दिशा परमार ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात


‘बिग बॉस १४’ मध्ये सर्वात चर्चित जोडपे होते, ते म्हणजे राहुल वैद्य आणि दिशा परमार. दिशा या शोचा भाग नसली तरी ती देखील या शोमुळे बरीच लाईमलाईटमध्ये आली होती. राहुलने शोमध्ये दिशाला प्रपोज केल्यानंतर, चाहत्यांना तिच्या उत्तराची प्रतीक्षा होती. मात्र जेव्हा तिने राहुलला होकार दर्शविला, तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आस लागून आहे. आता त्या सर्व चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे.

राहुलने नुकतीच त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. होय, राहुल आणि दिशा या महिन्यात लग्न करणार आहेत आणि या संबंधित पोस्ट त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. हे जोडपे १६ जुलै रोजी मित्र आणि कुटूंबाच्या उपस्थितीत रेशीमगाठीत अडकणार आहे.

या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, “आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने, हा खास क्षण आपल्या सर्वांबरोबर शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे लग्न १६ जुलै २०२१ रोजी होणार असल्याची घोषणा करत आहोत. प्रेमाच्या या नवीन अध्यायची सुरूवात करताना आम्हाला तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे.” या पोस्टवर आता चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. (rahul vaidya and disha parmar to get married on july)

राहुल आणि दिशाची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली होती. पुढे त्यांचे बोलणे सुरू झाले आणि त्यांच्यात मैत्री झाली. त्याच वर्षी राहुल आणि दिशाने पहिल्यांदाच गाण्यासाठी शूट केले. त्यानंतर बिग बॉसच्या घरात राहुलच्या लक्षात आले, की तो दिशावर प्रेम करत आहे. त्यानंतर त्यांची प्रेमकथा सुरू झाली.

राहुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो आता ‘खतरो के खिलाडी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच त्याचे आणि दिशाचे ‘मधाणिया’ हे गाणे रिलीझ झाले, ज्याला चाहत्यांकडून तूफान पसंती मिळाली. त्यानंतर त्याचे जॅस्मिन आणि अली गोनीवर ‘अली’ हे गाणे रिलीझ झाले. दिशाबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ आणि ‘वो अपना सा’ या मालिकेत झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.