Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

पूर्ण रीती-रिवाजानुसार झाला दिशा परमारचा गृहप्रवेश; राहुल वैद्यने शेअर केला व्हिडिओ

ग्लॅमरच्या दुनियेमध्ये पॉवर कपल्सच्या यादीत समाविष्ट झालेल्या गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांनी नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. १६ जुलै २०२१ रोजी लग्न करून, ते कायमचे एकमेकांचे बनले. राहुल वैद्य आणि दिशा परमारचे लग्नाआधी ते लग्नानंतरपर्यंतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यावर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत. लग्नानंतर आता या नवविवाहित जोडप्याच्या घरात प्रवेश करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राहुलची आई पूर्ण विधी करून आपल्या सूनचे स्वागत करताना दिसत आहे.

पूर्ण रीतीरिवाजानुसार झाला दिशाचा गृहप्रवेश
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, हिरव्या रंगाची साडी नेसलेली राहुलची आई प्रथम सून व मुलाच्या कपाळावर टिळक लावते. यानंतर अक्षता टाकल्यानंतर, ती आरती करते. मग दिशा पुढे येते आणि गृहप्रवेशची संपूर्ण विधी पूर्ण करते. या विधी दरम्यानही दिशाचा लूक खूप साधा आणि मनमोहक असलेला पाहायला मिळाला.

असा होता दिशाचा लूक
गृहप्रवेश दरम्यान दिशाने लाल पलाझो पँट आणि कुर्ता सेट, हातात लाल बांगड्याचा चुडा, साधं मंगळसूत्र आणि केसात एक पोनीटेल बांधलेली आहे. दुसरीकडे, राहुल कॅज्युअल टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट कॉम्बोमध्ये स्मार्ट दिसत आहे. या जोडप्याच्या गृहप्रवेशचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या नवविवाहित जोडीच्या व्हिडिओला पसंती देऊन, चाहते त्यांचे त्यांचे अभिनंदन करत आहेत. (rahul vaidya family welcome her daughter in law disha parmar in the house see griha pravesh pictures)

राहुल वैद्यने ‘बिग बॉस १४’ द्वारे प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. या सीझनमध्ये त्याची आणि दिशाची लव्हस्टोरी खूपच चर्चेत आली होती. शो दरम्यानच त्याने दिशाला प्रपोज केले होते. यानंतर दिशा बिग बॉसच्या घरात आली आणि त्याचे प्रपोजल स्वीकारले. त्यानंतरच राहुल आणि दिशाच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-आषाढी निमित्त गायक ‘जयदीप बगवाडकर’नं विठुरायाला ‘वारी नाही रे’ या गाण्याने घातली भावनिक साद

हे देखील वाचा